भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. वन डे क्रिकेटमध्ये त्रिशतकी भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली होती. १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी तुफान फटकेबाजी केली होती. इरफान पठाणच्या पत्नीच्या फोटोवरून सुरू झालाय नवा वाद; क्रिकेटपटू म्हणतो, मी तिचा मालक नाही, जोडीदार!
श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चामिंडा वासनं भारताचा सलामीवीर सदगोपण रमेश याला बाद केले. त्यानंतर द्रविड व गांगुली या जोडीनं आक्रमक खेळ केला. मुथय्या मुरलीधरन यालाही या दोघांना रोखता आले नाही. द्रविडनं सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली, तर गांगुलीनं ११९ चेंडूंत शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढील ३९ चेंडूंत त्यानं १८३ धावांचा पल्ला गाठला.
पाहा व्हिडीओ..