भारतीय संघानं कोलकाता कसोटीत २००१साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास खेचून आणला होता, इतिहास हा सामना कधीच विसरणार नाही. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. पण, त्यानंतर कोलकाता कसोटीत टीम इंडियानं केलेलं कमबॅक हे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याच्यासाठी धक्का देणारं ठरलं. ऑस्ट्रेलियाची सलग १६ कसोटी सामन्यांतील अपराजित मालिका टीम इंडियानं खंडीत केली होती. जसप्रीत बुमराहसाठी आजचा दिवस आहे खास; गोव्यात अडकणार विवाह बंधनात
ऑस्ट्रेलियां प्रथम फलंदाजी करताना ४४५ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार स्टीव वॉनं ११० आणि मॅथ्यू हेडननं ९७ धावांची खेळी केली होती. या सामन्यात हरभजन सिंगनं ( Harbhajan Singh's hat-trick ) हॅटट्रिक घेतली होती आणि कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता. तरीही कागांरूंनी मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!
भारताचा पहिला डाव १७१ धावांवर गुंडाळून ऑसींनी २७४ धावांची आघाडी घेत यजमानानं फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ४ फलंदाज २३२ धावांत माघारी परतले होते. पण, व्हीव्हीएस लक्ष्मण ( २८१) आणि राहुल द्रविड ( १८०) ( VVS Laxman - Rahul Dravid ) ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३७६ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि सामन्याचे चित्रच बदललं. ओए चारो तरफ घुम के बॅट दिला; विराट कोहली मैदानावर इशान किशनकडे बघून ओरडला, Video