२ एप्रिल २०११, ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत... २८ वर्षांनंतर टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला... सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचं वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न संपूर्ण संघानं मिळून पूर्ण केलं होतं. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं मारलेल्या खणखणीत षटकारानंतर मुंबईचं वानखेडे स्टेडियम जल्लोषानं दणाणून निघालं होतं. आज त्या दिवसाला १० वर्ष पूर्ण होत आहेत. कॅन्सरशी संघर्ष करत युवराज सिंगनं ( Yuvraj Singh) टीम इंडियाला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. जेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर खेळाडूंनी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून स्टेडियमला मारलेली प्रदक्षिणा आजही आठवली की मन भावनिक होतं. ( On this day: MS Dhoni's India brought an end to 28-year-long wait for second World Cup title)
२८ वर्षानंतर टीम इंडियानं दुसऱ्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर सलग दोन वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीलंकेचं आव्हान होतं. घरच्या मैदानावर कोणत्याच संघाला जेतेपद पटकावता न आल्याचा इतिहास होता आणि त्यामुळे भारतीयांच्या पोटात गोळाच आला होता. वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त दोन वेळाच धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला होता आणि ज्या संघातील खेळाडूनं शतक झळकावलं तो कधीच हरला नव्हता. ही सर्व आकडेवारी चूकीची ठरवून टीम इंडियानं जेतेपद उंचावले होते.
Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'!माहेला जयवर्धनेनं १०३ धावांची खेळी करताना श्रीलंकेला ६ बाद २७४ धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानंतर लसिथ मलिंगानं टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. गौतम गंभीर ( Gautam Gambhir) खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. त्यानं ९७ धावांची खेळी केली. मुथय्या मुरलीधरनचा सामना करण्यासाठी कर्णधार धोनीनं स्वतःला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला प्रमोशन दिलं अन् युवराज सिंगला मागे ठेवले. धोनीचा हा डाव यशस्वी ठरला. धोनीनं ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावा चोपल्या. नुवान कुलसेकरानं टाकलेल्या ४९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला अन् एकच जल्लोष झाला.
पाहा व्हिडीओ..
Web Title: On This Day in 2011, Team India created history by clinching their second ODI World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.