मुंबई : ट्वेन्टी-20 क्रिकेट आता चांगलेच रुळले आहे. पण अकरा वर्षांपूर्वी मात्र हे क्रिकेट तग धरेल का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. 2007 साली ट्वेन्टी-20 क्रिकेटचा पहिला विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला होता. या विश्वचषकाला गवसणी घातली होती ती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने. पण या विश्वचषकात पहिले शतक पाहण्याचा योग आला होता. हे शतक या दिवशीच 2007 साली झाले होते.
विश्वचषकातील पहिला सामान यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झाला होता. या सामन्यात धडाकेबाज ख्रिस गेलने आक्रमक फलंदाजी करत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये पहिला शतकवीर होण्याचा मान पटकावला होता. गेलने या खेळीमध्ये 57 चेंडूंमध्ये सात चौकार आणि दहा षटकारांची आतषबाजी केली होती. या दमदार फटकेबाजीच्या जोरावर गेलने 117 धावांची दणदणीत खेळी साकारली होती.