Join us  

Kuldeep Yadav, DC vs KKR IPL 2022 : 0, wide, 1, W, 4, W,W!; कुलदीप यादवने सामनाच फिरवला, त्याचा अफलातून झेल पाहून कोलकाताला पश्चाताप झाला, Video

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates : खलिल अहमदने सुरुवातीला धक्के दिल्यानंतर कुलदीप यावदने ( Kuldeep Yadav) मोर्चा सांभाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 7:30 PM

Open in App

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates : खलिल अहमदने सुरुवातीला धक्के दिल्यानंतर कुलदीप यावदने ( Kuldeep Yadav) मोर्चा सांभाळला. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कोलकाता नाईट रायडर्सला शक्य नाही हे आधिच कळले होते. पण, कर्णधार श्रेयस अय्यर व नितीश राणा ही जोडी खेळपट्टीवर असेपर्यंत KKRला आशा होती. ललित यादवने नितीशला ( ३०) माघारी पाठवले आणि त्यानंतर कुलदीपने फिरकीच्या तालावर KKRला नाचवले. आयपीएलमधील माजी संघाविरुद्ध कुलदीपने प्रभावशाली कामगिरी केली. त्याने उमेश यादवचा घेतलेला झेल हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. 

सलामीवीर पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करताना मजबूत पाया रचला. पृथ्वीने २९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा केल्या. वॉर्नरनेही आयपीएल २०२२मधील पहिले अर्धशतक झळकावताना ४५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा केल्या. कर्णधार रिषभ पंत ( २७), अक्षर पटेल ( २२*) व शार्दूल ठाकूर ( २९*) यांनीही योगदान दिले. कोलकाताच्या सुनील नरीनने दोन विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सने ५ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला. 

लक्ष्याचा पाठलाग करताना मुस्ताफिजूर रहमानने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला जीवदान मिळाले. तरीही तो फार मोठी खेळी करू शकला नाही. खलिल अहमदने KKRला पहिला धक्का देताना वेंकटेश अय्यरला ( १८) बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात अहमदने अजिंक्यची विकेट काढली. शार्दूल ठाकूरने त्याचा अफलातून झेल घेतला. कर्णधार श्रेयस व नितीशने ५०+ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पंरतु ललित यादवने ही जोडी तोडली. त्यानंतर कुलदीपची जादू चालली. त्याने १३व्या षटकात श्रेयसला बाद केले. श्रेयसने ३३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा केल्या. त्यानंतर १५व्या षटकात कुलदीपने कहर केला. तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सची विकेट घेतल्यानंतर पाचव्या व सहाव्या चेंडूवर अनुक्रमे सुनील नरीन व उमेश यादवला बाद केले. कुलदीपने भन्नाट झेल घेत उमेशला माघारी जाण्यास भाग पाडले. कुलदीपने ३५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. 

पाहा व्हिडीओ...     

टॅग्स :आयपीएल २०२२कुलदीप यादवकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App