Indian Premier League ( IPL 2020) मध्ये शाहजाह येथे होणाऱ्या दोन सामन्यांत संघांनी दोनशेपार धावा चोपल्या. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि कोलकात नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातल्या सामन्यातही चौकार-षटकारांनी आतषबाजी पाहायला मिळाली. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw), श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी पहिल्या डावात तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर DCने तगडं आव्हान उभं केलं. नितिश राणा ( Nitish Rana), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) यांनीही KKRसाठी जोरदार फटकेबाजी केली. क्रिकेट प्रेमींना अपेक्षित असाच हा सामना झाला. पण, यावेळी विजयाचे पारडे दिल्लीच्या पारड्यात पडले.
KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पृथ्वी आणि शिखर धवन यांनी DCला पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. धवन 16 चेंडूंत 26 धावांवर माघारी परतल्यानंतर पृथ्वी आणि कर्णधार श्रेयस यांनी षटकारांचा वादळच आणलं. पृथ्वीनं यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 41 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावा केल्या. त्यानंतर अय्यरने शारजाहच्या चहूबाजूंना चेंडू टोलवला. रिषभ पंतनेही तिसऱ्या विकेटसाठी श्रेयससह अर्धशतकी भागीदारी केली. पंत 17 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 38 धावांत माघारी परतला. श्रेयसनं 38 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या. आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात एक विकेट घेत 7 धावा दिल्या. दिल्लीने 4 बाद 228 धावा चोपल्या.
इरफान पठाण अन् हरभजन सिंग यांचा MS Dhoniला वाढत्या वयावरून अप्रत्यक्ष टोला? ट्विटने उंचावल्या भुवया
प्रत्युत्तरात KKRच्या सलामीवीरांकडूनही स्फोटक सुरुवात अपेक्षित होती. सातत्यानं अपयशी ठरणारा सुनील नरीन ( Sunil Narine) आज मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा होती. पण, अॅनरिच नॉर्ट्जेनं दुसऱ्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. नितिश राणा आणि शुबमन गिल यांनी दमदार खेळ केला. अमित मिश्रानं ही जोडी तोडली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. गिल 22 चेंडूंत 28 धावा करून माघारी परतला. हर्षल पटेलच्या एका षटकात सामना फिरवला. हर्षलने ( Harshal Patel) KKRच्या दोन्ही सेट फलंदाजांना बाद केले. तत्पूर्वी, कागिसो रबाडानं KKR चा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल ( 13) याला रोखले.
2020 हे वर्ष खरंच खराब!, Point Table मध्ये RCB अव्वल, तर CSK तळाला!; दिग्गज क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल
नितिश राणा 35 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार मारून 58 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कार्तिक ( 6) बाद झाला. धावांचा डोंगर डोळ्यासमोर असल्यामुळे KKR दडपणाखाली गेले. त्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करून DCला रोखले. दिल्ली हा सामना सहज जिंकतील असेच वाटत असताना इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) यांनी पाच षटकांत 78 धावा चोपून सामन्यातील चुरस कायम राखली. मॉर्गन 18 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकार खेचून 44 धावांवर बाद झाला. 6 धावांत 26 धावांची गरज असताना त्रिपाठीनं पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. पण, मार्कस स्टॉयनिसनं दुसऱ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्रिपाठी 16 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार मारून 36 धावांवर माघारी परतला. त्यानंतर DCने हा सामना जिंकला. KKRला 8 बाद 210 धावाच करता आल्या.
Web Title: DC vs KKR Latest News : Delhi Capitals beat Kolkata Knight Riders by 18 runs; go top on Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.