Indian Premier League ( IPL 2020) मध्ये शाहजाह येथे होणाऱ्या दोन सामन्यांत संघांनी दोनशेपार धावा चोपल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि कोलकात नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातल्या सामन्यातही चौकार-षटकारांनी आतषबाजी अपेक्षित होतं. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw), श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी पहिल्या डावात तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर DCने तगडं आव्हान उभं केलं.
KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पृथ्वी आणि शिखर धवन यांनी DCला पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. धवन 16 चेंडूंत 26 धावांवर माघारी परतल्यानंतर पृथ्वी आणि कर्णधार श्रेयस यांनी षटकारांचा वादळच आणलं. पृथ्वीनं यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 41 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावा केल्या. त्यानंतर अय्यरने शारजाहच्या चहूबाजूंना चेंडू टोलवला. रिषभ पंतनेही तिसऱ्या विकेटसाठी श्रेयससह अर्धशतकी भागीदारी केली.
पंत 17 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 38 धावांत माघारी परतला. श्रेयसनं 38 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या. आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात एक विकेट घेत 7 धावा दिल्या. दिल्लीने 4 बाद 228 धावा चोपल्या.