IPL 2020 DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमी ( Mohammed shami) ने सुरेख गोलंदाजी करून DCच्या धावांवर लगाम लावली. पण, मार्कन स्टॉयनिसने तुफान फटकेबाजी करून KXIPच्या गोलंदाजाना हतबल केले. धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी निराश केले. मात्र, मयांक अग्रवालनं संयमी आणि दमदार खेळ करताना पंजाबला विजयासमीप आणले. पण, हा सामना बरोबरीत सुटल्यानं, सुपर ओव्हरमध्ये गेला. दिल्लीनं सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला.
IPL 2020 Live Updates, Click here
-
आयपीएलचे सुपर ओव्हर
1-2009- राजस्थान वीजयी2- 2010- पंजाब विजयी3- 2013- हैदराबाद विजयी4- 2013- बंगलोर विजयी5- 2014- राजस्थान विजयी6- 2015- पंजाब वीजयी7- 2017- मुंबई विजयी8- 2019- दिल्ली विजयी9- 2019- मुंबई विजयी
- मयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या. आयपीएलमधील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी त्याची सर्वौच्च खेळी नाबाद 69 धावांची होती. विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही.
मोहित शर्मानं टाकलेल्या 18 व्या षटकात 17 धावा चोपल्या. मयांकची ही फटकेबाजी 19व्या षटकातही कायम राहिली. DCचा कर्णधार श्रेयस अय्यरनं त्याचा झेल सोडला. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला असता. 6 चेंडूंत 13 धावांची गरज असताना मयांकनं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. पंजाबनं हा सामना 4 विकेट्स राखून जिंकला. मयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या. आयपीएलमधील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी त्याची सर्वौच्च खेळी नाबाद 69 धावांची होती.
- कृष्णप्पा गोवथम आणि मयांक यांनी सहाव्या विकेटसाठी साजेशी भागीदारी केली. 16व्या षटकात कागिसो रबाडानं ही जोडी तोडली. गोवथम 20 धावांवर माघारी परतला. मयांकनं एका बाजूनं संयमी खेळी करताना वैयक्तिक अर्धशतकासह पंजाबच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. मोहित शर्मानं टाकलेल्या 18 व्या षटकात 17 धावा चोपल्या.
Shocking; आर अश्विनला गंभीर दुखापत? प्रचंड वेदनेसह सोडले मैदान
अश्विनने सहाव्या षटकात KXIPला दोन धक्के दिले, परंतु अखेरच्या चेंडूवर एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले. त्याच्या डाव्या खांद्याला ही दुखापत झाली असून त्याला प्रचंड वेदना होताना पाहायला मिळाल्या. त्यानं तसेच मैदान सोडले.
- KL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. निकोलस पुरनला सहजतेनं त्यानं त्रिफळाचीत केलं. करुण नायरही त्याच्या गोलंदाजीवर फसला. ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु कागिसो रबाडानं त्याला बाद केले.
- दिल्लीसाठी खेळताना अश्विनने आपला माजी संघ किंग्ज ईलेव्हनविरुध्द पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. करुण नायरला त्याने पृथ्वीकरवी झेलबाद केले.
DC vs KXIP Latest News : मार्कस स्टॉयनिसची फटकेबाजी, वीरूच्या 8 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
- टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) DCला धक्के दिले, त्यात पदार्पणवीर रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi) याने DCच्या फलंदाजांना मोठे फटके मारू दिले नाही. पण, मार्कस स्टॉयनिसनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
मोहम्मद शमीचा भेदक मारा; पण मार्कस स्टॉयनिसनं फिरवला सामना
- पदार्पणवीर रवी बिश्नोईनंही 4 षटकांत 21 धावा देत 1 विकेट घेतली.
- शमीने षटकांत 15 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. IPLमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी त्यानं 2019मध्ये MI विरुद्ध 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
- श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) ने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. पण, युवा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रवी बिश्नोईनं ही सेट जोडी तोडली. त्यानं पंतला त्रिफळाचीत केले. त्यानंतर KL Rahulने शमीला पुन्हा पाचारण केले आणि त्यानं त्याचा विश्वास सार्थ ठरवला. Shamiने अय्यरला बाद केले.
-
- KL Rahulनं झेल सोडला? पण, शिखर धवनचा 'पोपट' झाला, भोपळ्यावर माघारी परतला
- कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी DCची विकेट्सची पडझड थांबवली. दोघांनी संयमी खेळ करताना दहा षटकांत 3 बाद 49 धावांपर्यंत मजल मारली होती.
-
- IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसरा सामना आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सुरू झाला आहे. KXIPने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या DCला दुसऱ्याच षटकात झटका बसला. DCचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याचा मोहम्मद शमीच्या ( Shami) गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर पहिल्या पाच षटकांत दिल्लीचे 3 फलंदाज माघारी परतले होते. शमीनं दोन विकेट्स घेतल्या.
DC vs KXIP Latest News : लोकेश राहुलची आजच्या सामन्यात अॅडम गिलख्रिस्टच्या 'Unique' विक्रमाशी बरोबरी
- IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं IPLमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे कान टोचले? म्हणाला...
- #KXIP overseas players: शेल्डन कोट्रेल ( Sheldon Cottrell) , निकोलस पुरन ( Nicholas Pooran), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) & ख्रिस जॉर्डन ( Chris Jordan)
- आजचा सामना हा किंग्ज ईलेव्हनचा कर्णधार के.एल.राहुल याचा कर्णधार म्हणून पहिला सामना आहे.
- आयपीएल एकदाही न जिंकलेल्या दोन संघांची ही लढत आहे.
- दोन्ही संघाचे कर्णधार , के.एल.राहुल (वय 28) व श्रेयस अय्यर (वय 25) हे यंदाच्या आयपीएलमधील तुलनेने सर्वात तरुण कर्णधार आहेत.
-
- दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals Players List (DC)- श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.
- किंग्स इलेव्हन पंजाब Kings XI Punjab Players List (KXIP)- ख्रिस गेल, मोहम्मग शमी, के गोवथम, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, निकोलस पूरण, करूण नायर, अर्षदीप सिंग, सर्फराज खान, हार्डस विलजोन, मनदीप सिंग, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, दीपक हुडा, जेम्स निशॅम, रवी बिश्नोई, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तरजींदर ढिल्लोन, प्रभसिमरन सिंग.