Join us  

DC vs MI Latest News : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर दिल्ली कॅपिटल्सनं टेकले गुडघे!

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रमथ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 5:07 PM

Open in App

DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) आव्हानाचा दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) सामना करावा लागत आहे. सलग तीन पराभवांमुळे DCनं प्ले ऑफचा स्वतःचा मार्ग खडतर बनवला. त्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या  सामन्यातही त्यांना घाम गाळावा लागला. MI गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर DCच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.   

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रमथ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकात त्याला माघारी पाठवलं. सूर्यकुमार यादवनं सुरेख झेल टिपला. पृथ्वी शॉचा निराशाजनक कामगिरीचा कित्ता याही सामन्यात कामय राहिला. बोल्टनं त्याला १० धावांवर बाद केले. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले होते. 

कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी ३५ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ११व्या षटकात क्विंटन डी'कॉकनं चपळ स्टम्पिंग करून दिल्लीला मोठा धक्का दिला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिसही ( २) जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच षटकात बुमराहनं दिल्लीला आणखी एक धक्का देताना पंतला २१ धावांवर पायचीत केले. बुमरानं पुढच्या षटकात हर्षल पटेलला पायचीत केले. दिल्लीचा अखेरचा आशास्थान हेटमायरही ( ११) लगेच बाद झाला. बोल्टनं ४ षटकांत २१ धावांत ३ विकेट घेतल्या. बुमराहनं १७ धावांत ३ विकेट घेत दिल्लीला ९ बाद ११० धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सजसप्रित बुमराह