DC vs MI : इशान किशनचे अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा सहज विजय

इशान किशननं नाबाद अर्धशतक झळकावून मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत, तर मुंबईच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १८ गुण झाले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 02:56 PM2020-10-31T14:56:59+5:302020-10-31T18:31:22+5:30

whatsapp join usJoin us
DC vs MI Live Score Delhi Capitals vs Mumbai Indians IPL 2020 Live Score and Match updates | DC vs MI : इशान किशनचे अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा सहज विजय

DC vs MI : इशान किशनचे अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा सहज विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. IPL 2020च्या पहिल्या हाफमधील खेळ पाहता दिल्ली प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करतील असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात DCला सलग चार पराभव पत्करावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. MIच्या गोलंदाजांसमोर त्यांनी लोटांगण घातले. MIने अगदी सहज हा सामना जिंकला.  

DC vs MI Latest News & Live Score : 

इशान किशन-क्विंटन डी'कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. क्विंटन डी'कॉक २६ धावांवर माघारी परतला. इशान किशननं नाबाद अर्धशतक झळकावून मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत, तर मुंबईच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १८ गुण झाले आहेत. मुंबईनं १४.२ षटकांत लक्ष्य पार केले. 
 

इशान किशन-क्विंटन डी'कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. क्विंटन डी'कॉक २६ धावांवर माघारी परतला. 
 

कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी ३५ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ११व्या षटकात क्विंटन डी'कॉकनं चपळ स्टम्पिंग करून दिल्लीला मोठा धक्का दिला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिसही ( २) जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच षटकात बुमराहनं दिल्लीला आणखी एक धक्का देताना पंतला २१ धावांवर पायचीत केले. बुमरानं पुढच्या षटकात हर्षल पटेलला पायचीत केले. दिल्लीचा अखेरचा आशास्थान हेटमायरही ( ११) लगेच बाद झाला. बोल्टनं ४ षटकांत २१ धावांत ३ विकेट घेतल्या. बुमराहनं १७ धावांत ३ विकेट घेत दिल्लीला ९ बाद ११० धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. 
 

कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी ३५ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ११व्या षटकात क्विंटन डी'कॉकनं चपळ स्टम्पिंग करून दिल्लीला मोठा धक्का दिला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिसही ( २) जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकात त्याला माघारी पाठवलं. सूर्यकुमार यादवनं सुरेख झेल टिपला. पृथ्वी शॉचा निराशाजनक कामगिरीचा कित्ता याही सामन्यात कामय राहिला. बोल्टनं त्याला १० धावांवर बाद केले. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले.  मुंबई इंडियन्सचा विक्रम; जगातील तगड्या संघांना टाकले मागे!

मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक ट्वेंटी-20 सामन्यांचा विक्रमही नावावर केला. त्यांचा हा २२२ वा ट्वेंटी-20 सामना आहे. सोमरसेट ( २२१), हॅम्पशायर ( २१७), ससेक्स ( २१२) आणि सरे ( २११) यांचा क्रमांक त्यानंतर येतो.  
 

- मुंबईच्या संघात दोन बदल; हार्दिक पांड्याला विश्रांती, जेम्स पॅटिन्सनला वगळलं; जयंत यादव व नॅथन कोल्टर-नायल यांची एन्ट्री

- मुंबई इंडियन्सचा संघः क्विंटन डी'कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जयंत यादव, नॅथन कोल्टर-नायल, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 

- दिल्ली कॅपिटल्सच्या संघात तीन बदल; पृथ्वी शॉ, प्रविण दुबे व हर्षल पटेल यांना स्थान, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल व तुषार देशपांडे यांना वगळले

-  दिल्ली कॅपिटल्सचा संघः पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, आर अश्विन, प्रविण दुबे, अॅनरिच नॉर्ट्झे

- आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळण्याचा पहिला मान मुंबई इंडियन्स पटकावणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या १९९ सामन्यांपैकी मुंबई इंडियन्सनं ११५ विजय मिळवले आहेत, तर ८० वेळा त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं. दोन सामने टाय झाल्यानंतर जिंकले, तर दोन टाय सामन्यांत पराभव झाला. 

- रोहित शर्मा आजचा सामना खेळण्याची शक्यता फार कमी आहे. दुखापतीमुळे तो मागील तीन सामन्यांना मुकला होता. त्यामुळेच त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. 

Web Title: DC vs MI Live Score Delhi Capitals vs Mumbai Indians IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.