DC vs SRH Latest News : सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला Indian Premier League ( IPL 2020) आजच्या पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघाच्या धावगतीवर त्यांनी वेसण घातले. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि केन विलियम्सन ( Kane Williamson ) यांनी दमदार खेळ करत संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर रशीद खान ( Rashid Khan) नं मॅच विनिंग गोलंदाजी केली. त्याला भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, अभिषेक वर्मा आणि टी नटराजन यांची सुरेख साथ लाभली.
DC vs SRH Latest News & Live Score :
- अखेरच्या षटकात SRHला विजयासाठी 27 धावांची गरज होती, परंतु त्यांच्या तळाच्या फलंदाजांना हे आव्हान पेलवलं नाही. दिल्लीला 7 बाद 147 धावा करता आल्या. हैदराबादनं 15 धावांनी सामना जिंकला.
- रशीदनं 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
3/14 वि. दिल्ली कॅपिटल्स, अबु धाबी 2020
3/19 वि. गुजरात लायन्स, हैदराबाद 2017
3/19 वि. किंग्स इलेव्हन पंजाब, 2010
3/19 वि. कोलकाता नाइट रायडर्स, 2018
- शिमरोन हेटमायर आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी 42 धावांची ताबडतोड भागीदारी केली. रिषभ व हेटमायर यांनी सुरेख षटकार खेचले. ही जोडी तोडण्यासाठी वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला पाचारण केले आणि त्यानं यश मिळवून दिले. शिमरोन हेटमायर 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 21 धावांवर मनीष पांडेच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
- 12व्या षटकात रशीदनं DCला मोठा दणका दिला. शिखर धवनला ( Shikhar Dhawan) त्याने यष्टिंमागे जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. धवनने 34 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) 2 धावांवर पहिल्याच षटकात माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याला बाद केलं. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, रशीद खाननं ( Rashid Khan) अय्यरला ( 17) बाद करून 40 धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली.
-मिश्रानं पुढच्या षटकात मनीष पांडेला ( 3) बाद केले. DCच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना SRHच्या धावगतीला लगाम लावून ठेवला होता. SRHचे चाहते ज्याची वाट पाहत होते, तो केन विलियम्सन ( Kane Williamson) याचे अखेर IPL 2020त पदार्पण झाले. केननं त्याच्या क्लासिक फटक्यांनी चाहत्यांना खुशही केले. SRHनं 15 षटकांत 2 बाद 115 धावा केल्या होत्या. त्याची फटकेबाजी पाहून चाहत्यांना आनंद झाला. बेअरस्टोनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूंवर कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) त्याला बाद केलं. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला. केननंही 26 चेंडूंत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) 20 षटकांत 4 बाद 162 धावा केल्या.
- SRHनं 15 षटकांत 2 बाद 115 धावा केल्या होत्या. त्याची फटकेबाजी पाहून चाहत्यांना आनंद झाला. बेअरस्टोनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूंवर कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) त्याला बाद केलं. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला.
- SRHचे चाहते ज्याची वाट पाहत होते, तो केन विलियम्सन ( Kane Williamson) याचे अखेर IPL 2020त पदार्पण झाले. केननं त्याच्या क्लासिक फटक्यांनी चाहत्यांना खुशही केले. SRHनं 15 षटकांत 2 बाद 115 धावा केल्या होत्या.
- मिश्रानं पुढच्या षटकात मनीष पांडेला ( 3) बाद केले. DCच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना SRHच्या धावगतीला लगाम लावून ठेवला होता.
- SRHच्या फलंदाजांनी गिअर बदलला आणि 8च्या सरासरीनं धावा करण्यास सुरुवात केली. 10व्या षटकात अमित मिश्रानं ( Amit Mishra) DCला पहिले यश मिळवून दिले. त्यानं वॉर्नरला बाद केले. पंचांनी नाबाद दिल्यानंतर DCनं DRS घेतला आणि त्यात वॉर्नर बाद असल्याचे स्पष्ट झाले. वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या
-दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) SRHविरुद्ध आक्रमक रणनीती वापरली. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) हे स्फोटक फलंदाज समोर असताना DCनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये चार गोलंदाजांचा वापर केला. त्यात उत्तम क्षेत्ररक्षण लावून DCनं त्यांना मोठे फटके मारण्यापासूनही रोखलं. SRHला पहिल्या 6 षटकांत 38 धावा करता आल्या, त्यापैकी 14 धावा सहाव्या षटकात आल्या.
IPLमध्ये खेळणारा जम्मू-काश्मिरचा तिसरा खेळाडू
परवेझ रसूल - 2013-16
रसिख सलाम - 2019
अब्दुल समाद - 2020
रसूलने 2014-15मध्ये SRHचे प्रतिनिधित्व केलं
मंझूर
SRH vs DC Head To Head
एकूण - 15 सामने
हैदराबाद - 9
दिल्ली -6
अबु धाबीतील कामगिरी
DC - 1 सामना, 1 पराभव
SRH - 2 सामने, 2 पराभव
आज कोणते विक्रम तुटणार
- 3 बळी आणि 6 षटकार आजच्या सामन्यात रिषभ पंतनं मिळवल्यास त्याच्या नावावर IPLमधील अनुक्रमे 50 बळी व 100 षटकार पूर्ण होतील
- मनीष पांडेला IPL मध्ये 3000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 72 धावांची गरज आहे
- शिखर धवनला IPL मध्ये 100 षटकार व 1000 धावा ( DC कडून) पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 3 षटकार व 104 धावा हव्या आहेत
- सिद्धार्थ कौलने 1 विकेट घेतल्यास IPLमध्ये तो विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करेल.
Web Title: DC vs SRH Live Score Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2020 Live Score and Match updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.