चेन्नईचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले; दिल्लीचा 34 धावांनी विजय
नवी दिल्ली : तळाला असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय मिळवून अव्वल स्थानावर विराजमान व्हायचे, असे स्वप्न चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाहत होता. पण दिल्लीच्या युवा सेनेने त्यांचा 34 धावांनी पराभूत केले आणि चेन्नईचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून अंबाती रायुडूने अर्धशतकी खेळी साकारत तीन हजार धावांचा पल्लाही गाठला. पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. रायुडूने 29 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या. रायुडूचा अपवाद वगळता चेन्नईच्या अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
11.37 PM : दिल्लीचा चेन्नईवर 34 धावांनी विजय
11.34 PM : ब्राव्हो OUT; चेन्नईला सहावा धक्का
11.18 PM : महेंद्रसिंग धोनी बाद; चेन्नईला मोठा धक्का
- ट्रेंट बोल्टने धोनीला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. धोनीला 17 धावा करता आल्या.
11.08 PM : सॅम बिलिंग्स OUT; चेन्नईला चौथा धक्का
- अमित मिश्राने बिलिंग्सला बाद करत चेन्नईला चौथा धक्का दिला. बिलिंग्सला एका धावेवरच समाधान मानावे लागले.
10.59 PM : सुरेश रैना OUT; चेन्नईला तिसरा धक्का
- संदीप फिरकीपटू लामिचानेने रैनाला बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला. रैनाला 15 धावांवर समाधान मानावे लागले.
10.47 PM : महेंद्रसिंग धोनीच्या ट्वेन्टी-20मधील 6000 धावा पूर्ण
10.37 PM : अर्धशतकानंतर रायुडू झटपट बाद
- अंबाती रायुडूला अर्धशतकानंतर एकही धाव करता आली नाही. रायुडूने 29 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या.
10.35 PM : अर्धशतकांसह रायुडूच्या आयपीएलमधील 3000 धावा पूर्ण
10.28 PM : चेन्नईला पहिला धक्का; शेन वॉटसन बाद
- फिरकीपटू अमित मिश्राने वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसनने 14 धावा केल्या.
10.23 PM : सहाव्या षटकात अंबाती रायुडूचे तीन षटकार; 22 धावांची लूट
10.15 PM : चेन्नईची संथ सुरुवात; पाच षटकांत बिनबाद 22
पहिल्या डावातील महत्त्वाच्या घटना ट्विटरच्या माध्यमातून पाहा
अखेरच्या षटकात दिल्लीचे चार षटकार; चेन्नईपुढे 163 धावांचे आव्हान
नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जवुरुद्धच्या सामन्यात दिडशे धावांचा टप्पा गाठणार की नाही, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण विजय शंकर आणि हर्षल पटेल यांनी अखेरच्या षटकात एकूण चार षटकार लगावले आणि दिल्लीला चेन्नईपुढे 163 धावांचे आव्हान ठेवता आले. पटेलने फक्त 16 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 36 धावा केल्या, तर शंकरने 28 चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद 36 धावा केल्या. दिल्लीकडून रिषभ पंतने सर्वाधिक 38 धावांची खेळी साकारली.
9.39 PM : दिल्लीचे चेन्नईपुढे 163 धावांचे आव्हान
9.25 PM : दिल्ली 18 षटकांत 5 बाद 130
9.15 PM : दिल्लीला पाचवा धक्का; अभिषेक शर्मा बाद
- चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने अभिषेक शर्माला बाद करत दिल्लीला पाचवा धक्का दिला. दिल्ली 15 षटकांत 5 बाद 102.
चेन्नईची 'विसलपोडू' सेना कसे देते संघाला प्रोत्साहन... पाहा व्हीडीओ
9.07 PM : ग्लेन मॅक्सवेल OUT; दिल्लीला चौथा धक्का
- रवींद्र जडेजाला ग्लेन मॅक्सवेलला त्रिफळाचीत करत दिल्लीला चौथा धक्का दिला. मॅक्सवेलला पाच धावांवर समाधान मानावे लागले. दिल्ली 14 षटकांत 4 बाद 94.
8.55 PM : दिल्लीला मोठा धक्का; रिषभ पंत बाद
- लुंगी एनगिडीने अकराव्या अकराव्या षटकात श्रेयसनंतर पंतलाही तंबूचा रस्ता दाखवत दिल्लीला मोठे धक्के दिले. पंतने 26 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 38 धावा केल्या.
8.53 PM : दिल्लीला दुसरा धक्का; श्रेयस अय्यर बाद
- चेन्नईच्या लुंगी एनगिडीने कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. श्रेयसने तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या.
8.46 PM : SIXER NO. 750; यंदाच्या आयपीएलमधला एकूण 750 वा षटकार रिषभ पंतने लगावला
- हरभजन सिंगच्या दहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दिल्लीच्या रिषभ पंतने षटकार लगावला. यंदाच्या आयपीएलमधला हा एकूण 750वा षटकार ठरला. गेल्या सामन्यात षटकारांची संख्या 747 एवढी होती. या सामन्यात पृथ्वी शॉने संघासाठी पहिला षटकार लगावला, त्यानंतर पंतने दोन षटकार लगावत षटकारांचा 750 हा पल्ला गाठला.
8.40 PM : दिल्ली 9 षटकांत 1 बाद 60 धावा
गर्लंफ्रेंडबरोबरची डेट सोडून तो आला धोनीला पाहायला... पाहा हे ट्विट
8.24 PM : दिल्ली पाच षटकांत 1 बाद 33
8.17 PM : पृथ्वी शॉ OUT; दिल्लीला पहिला धक्का
- दीपक चहारने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉ याला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 17 धावा केल्या.
चेन्नईच्या चाहत्यांचा दिल्लीच्या स्टेडियमध्ये डान्स... पाहा हा व्हीडीओ
8.10 PM : पृथ्वी शॉ याचा तिसऱ्या षटकात दमदार षटकार
- दीपक चहारच्या तिसऱ्या षटकात पृथ्वीने दमदार षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले.
8.02 PM : पृथ्वी शॉ याचा दिल्लीसाठी पहिला चौकार
- सलामीवीर पृथ्वी शॉ याने दीपक चहार पहिल्याच षटकात चौकार लगावत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. दिल्लीने पहिल्या षटकात एकही फलंदाज न गमावता पाच धावा केल्या.
नाणेफेकीच्या वेळी धोनीला हसू का आवरता आले नाही... पाहा हा व्हीडीओ
7.30 PM : चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्लीला केले फलंदाजीसाठी पाचारण... पाहा हा व्हीडीओ
चेन्नई आणि दिल्ली आमने-सामने
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये सर्वांनाच वेध लागले आहेत ते बाद फेरीचे. पण शुक्रवारी रंगणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हा सामना मात्र या साऱ्या गोष्टींना अपवाद असेल. कारण चेन्नईचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे, तर दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे जय-पराजय आणि सरासरीचे कोणतेच गणित या सामन्यात नसेल. त्यामुळे या सामन्यात क्रिकेटचा निखळ आनंद खेळाडूंसह चाहत्यांना घेता येणार आहे. चेन्नईचा संघ बाद फेरीत पोहोचला असला तरी दिल्लीविरुद्धचा सामना जिंकून अव्वल स्थानावर जाण्याची त्यांचासाठी नामी संधी असेल. त्याचबरोबर हा सामना रंगणार आहे तो युवा आणि अनुभवी खेळाडू यांच्यामध्ये. कारण दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा भरणार आहे, तर चेन्नईच्या संघात जास्त अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात दिल्लीचा युवा सेना जिंकणार की अनुभव पणाला लावत चेन्नई बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
दोन्ही संघ
चेन्नई आणि दिल्लीच्या संघांचे स्टेडियममध्ये आगमन... पाहा हा व्हीडीओ