IPL 2021: दिल्लीनं दिली ४० ओव्हर्समध्ये द्विशतक ठोकलेल्या युवा भारतीय खेळाडूला संधी, खिळल्या सर्वांच्या नजरा 

IPL 2021, DD vs RR: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानात दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्यात सामना सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:44 PM2021-04-15T20:44:00+5:302021-04-15T20:45:41+5:30

whatsapp join usJoin us
dd vs rr live Lalit Yadav Quick facts 24 year old all rounder meets as IPL debut for Delhi Capital | IPL 2021: दिल्लीनं दिली ४० ओव्हर्समध्ये द्विशतक ठोकलेल्या युवा भारतीय खेळाडूला संधी, खिळल्या सर्वांच्या नजरा 

IPL 2021: दिल्लीनं दिली ४० ओव्हर्समध्ये द्विशतक ठोकलेल्या युवा भारतीय खेळाडूला संधी, खिळल्या सर्वांच्या नजरा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, DD vs RR: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानात दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे चार फलंदाज स्वस्तात बाद झाले आहेत. मैदानात सध्या दिल्लीचा डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार रिषभ पंतवर आली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत असलेला एक अष्टपैलू खेळाडू रिषभ पंतची साथ देतोय. 

अनुभव असूनही संघात नव्हता, आज संधी मिळाली अन् त्यानं दाखवून दिलं; दिल्लीला दिले धक्के!

दिल्लीनं आज संघात अष्टपैलू खेळाडू ललित यादव याला संधी दिली आहे. पदार्पणात ललित यादववर मोठी जबाबदारी आली आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि मार्कस स्टॉयनिससारखे महत्वाचे खेळाडू स्वस्तात बाद झाले आहेत. त्यामुळे आता ललित यादवच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

कोण आहे ललित यादव?
२४ वर्षीय ललित यादवनं स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दिल्लीकडून खेळताना ललित यादव यानं १२ सामन्यांमध्ये ५७० धावा केल्या आहेत. तर ९ विकेट्स देखील घेतल्या आहेत. तर 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये २४ सामन्यांत ४५९ धावा केल्या असून २९ बळी घेतले आहेत. ललित यादवनं आतापर्यंत ३५ टी-२० सामने खेळले असून ५६० धावा केल्या आहेत आणि २७ विकेट्स घेतल्या आहेत. 

धोनी असो किंवा विराट अन् रोहित सर्वांनी केलं नाराज, 'या' संघाला मिळाले १०० पैकी १०० गुण!

अंडर-14 क्रिकेटमध्ये ललित यादव यानं एका सामन्यात ४० षटकांमध्ये द्विशतक ठोकलं होतं. त्यासोबतच सलग दोन सामन्यांमध्ये सहा षटकार ठोकण्याचाही विक्रम त्याच्या नावावर आहे. क्लब क्रिकेटमध्ये त्यानं हा कारनामा केला आहे. एका सामन्यात 46 चेंडूत १३ षटकार आणि ९ चौकारांच्या साथीनं १३० धावांची दमदार खेळी साकारली होती. याआधी डीडीसीए टी20 लीगमध्येही ललितनं ६ षटकार ठोकले होते. 
 

Web Title: dd vs rr live Lalit Yadav Quick facts 24 year old all rounder meets as IPL debut for Delhi Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.