Join us  

अफलातून! भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या फलंदाजाने सुपर ओव्हरमध्ये जिंकवला सामना

Deandra Dottin WCPL 2024: एकाच खेळाडूने आधी भालाफेकमध्ये मेडल मिळवलं, नंतर क्रिकेटमध्ये जलवा दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:16 AM

Open in App

Deandra Dottin WCPL 2024: टी२० क्रिकेटच्या सामन्यात मॅच इतकीच रोमांचक असते ती म्हणजे सुपर ओव्हर. त्यातही नीरज चोप्राप्रमाणे भालाफेक खेळलेल्या खेळाडूने क्रिकेटचा सामना जिंकवून दिला तर आनंद नक्कीच द्विगुणित होतो. असाच काहीसा प्रकार वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाला. या लीगमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या डिआंड्रा डॉटिन हिने दमदार फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जनेही विजयात मोलाची भूमिका बजावली.

  • डिआंड्रा डॉटिनची जबरदस्त फलंदाजी

WCPL 2024 चा चौथा सामना त्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात झाला. ट्रिनबागो नाईट रायडर्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १२८ धावा केल्या. डिआंड्रा डॉटिनचा अवघ्या ३८ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ५३ धावा केल्या. ॲमेझॉन वॉरियर्सला १२९ धावांचे लक्ष्य मिळाले. ते पार करताना एरिन बर्न्स हिने ५० चेंडूत खेळलेल्या ६१ धावांच्या खेळीमुळे वॉरियर्स संघाला २० षटकांत ५ विकेट्स गमावत १२८ धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

पाहा सुपर ओव्हरचा थरार

सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये डिआंड्रा डॉटिनने चांगली फटकेबाजी केली. सुपर ओव्हरमध्ये तिने ४ चेंडूत २ षटकारांसह १३ धावा केल्या. तर उर्वरित २ चेंडूत जेमिमाने एका चौकारासह ६ धावा केल्या. अशाप्रकारे त्रिनबागो नाईट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता १९ धावा केल्या. २० धावांचा पाठलाग करताना त्यांनी दोन्ही विकेट गमावत सामना हरला.

  • डिआंड्राने भालाफेकमध्ये जिंकले होते सुवर्णपदक

त्रिनबागो नाईट रायडर्सला विजय मिळवून देणारी डिंड्रा डॉटिन होती, जिने क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ॲथलेटिक्सच्या मैदानावर आपले यश स्थापित केले होते. त्याने वयाच्या १३-१४ व्या वर्षी ज्युनियर स्तरावर भालाफेक आणि शॉटपुट यांसारख्या ऍथलेटिक्स स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. 2007 मध्ये, त्याने सीएसी ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक आणि शॉटपुट या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्याने 20 वर्षांखालील कॅरिफ्टा गेम्समध्ये भालाफेकमध्येही सुवर्णपदक पटकावले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलटी-20 क्रिकेटमहिला टी-२० क्रिकेटवेस्ट इंडिज