Join us  

Ranji Trophy, Karun Nair: "मला आणखी एक संधी द्या", भारतासाठी त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूने घातली भावनिक साद!

भारतीय संघात स्थान मिळाल्याने भारताकडून त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूने नाराजी व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:25 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संध सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. शनिवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला ज्यात भारताने बाजी मारली. मात्र मालिकेतील सलामीचे दोन सामने जिंकून यजमान बांगलादेशच्या संघाने २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जयदेव उनाडकटची भारतीय संघात निवड झाल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोहम्मद शमीच्या दुखापतीनंतर उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीमुळे अनेक खेळाडूंच्या संघात पुनरागमन करण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भारतासाठी त्रिशतक झळकावणारा करुण नायर त्यापैकीच एक आहे.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या या फलंदाजाला आता कर्नाटक संघाच्या रणजी संघातूनही वगळण्यात आले आहे. वारंवार संघातून डावलल्यानंतर करून नायरने एक ट्विट करून भावनिक साद घातली आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी द्या." त्याच्या या ट्विटवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. नायरची आता सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. त्याने ८५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४८.९४ च्या सरासरीने ५,९२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान नायरने १५ शतके आणि २७ अर्धशतके झळकावली आहेत. 

इंग्लंडविरूद्ध झळकावले होते त्रिशतकदेशांतर्गत क्रिकेटमध्ये नायर नामांकित खेळाडू आहे. याच कारणामुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. नायरने निवडकर्त्यांना निराश केले नाही. डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नई येथे त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. नायर अचानक स्टार झाला, पण नशिबाने त्याला फार काळ साथ दिली नाही.

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

भारत विरूद्ध बांगलादेश कसोटी मालिका

  • १४-१८ डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
  • २२-२६ डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघइंग्लंडबीसीसीआयरोहित शर्मा
Open in App