Join us  

डिअर अंकल सचिन! लहानग्या चाहत्याचं मास्टर ब्लास्टरला पत्र

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात अनेक चाहते आहेत. यामध्ये लहानग्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत. त्यापैकीच एका लहानग्या चाहत्यानं सचिन तेंडुलकरला खास पत्र लिहिलं आहे. या लहानग्या चाहत्यानं मलाही तुझ्यासारखंच व्हायचं आहे, अशी इच्छा पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 6:48 PM

Open in App
ठळक मुद्दे'मी तुझा 'सचिनः अ बिलिअन ड्रीम्स' हा चित्रपट नुकताच पाहिला आणि खूप एन्जॉयही केला. एका लहानग्या चाहत्यानं सचिनला खास पत्रसचिनचे चाहते लहानग्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात अनेक चाहते आहेत. यामध्ये लहानग्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत. त्यापैकीच एका लहानग्या चाहत्यानं सचिन तेंडुलकरला खास पत्र लिहिलं आहे. या लहानग्या चाहत्यानं मलाही तुझ्यासारखंच व्हायचं आहे, अशी इच्छा पत्राद्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान, या लहानग्या चाहत्यानं पाठविलेलं हे पत्र सचिन तेंडुलकरनं आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे.'डिअर अंकल सचिन...' अशी पत्राची सुरुवात या लहानग्यानं केली आहे. या लहानग्या चाहत्याचं अरमान असं नाव असून त्यानं सचिन तेंडुलकरसारखं आपल्यालाही व्हायचं आहे, असं पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, अरमाननं हे पत्र स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. अरमाननं आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, 'मी तुझा 'सचिनः अ बिलिअन ड्रीम्स' हा चित्रपट नुकताच पाहिला आणि खूप एन्जॉयही केला. मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. तू माझं प्रेरणास्थान आहेस. मला तुझ्यासारखंच व्हायचं आहे. मला तुझ्यासारखं खेळून देशासाठी चषक जिंकायचं आहे. मला तुझी स्वाक्षरी असलेली बॅट भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू दिलेलं बक्षिस माझ्यासाठी मौल्यवान आहे,' असं त्यानं पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, अरमानच्या या पत्राबाबच सचिन तेंडुलकरनं त्याचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिन तेंडुलकरनं शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. 

 

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेट