Corona Virusमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोना विषाणूमुळे जणू जग थांबले आहे. जगभारतील अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. एकीकडे गांभार्यीची परिस्थिती असताना पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरनेकोरोना विषाणूच्या आडून काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त ट्विट केलं आहे. भाजपाने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानींचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू काश्मीरी जनतेचे सांत्वन करण्याची संधी सोडत नाहीत. अशीच संधी अख्तरने पुन्हा साधली. पण, त्याच्या या विधानाचा नेटिझन्सने चांगला समाचार घेतला.
कलम ३७० लागू केल्यानंतर काश्मीरमध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालय हेही बंद होते. तेथील काही प्रमुख नेत्यांनाही नजर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी चौफेर टीका केली होती. पण, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या जगाला काश्मीरम्हणून अख्तरनं प्रश्न विचारला. अख्तर ट्विट केलं की,''लॉकडाउन झाल्यानंतर कसं वाटतंय? - काश्मीर'' त्यानं या ट्विट आडून भारत सरकारवर निशाणा साधला आहे.
नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं लग्नात केली एक चूक, होऊ शकतो तीन वर्षांचा कारावास
Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?
Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला
MS Dhoniनं दिलेल्या 'सर' या उपाधीचा रवींद्र जडेजाला राग येतोय... जाणून घ्या कारण
#OnThisDay in 2012: सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी ठोकलं होतं 'महा'शतक!
Coronavirus : रोहित शर्मानं मानले डॉक्टर व नर्सचे मनापासून आभार; पण कशासाठी?
Web Title: Dear World, How is the lockdow? Kashmir, Shoaib Akhtar Controversial Tweet svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.