कोची : स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छिणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याच्याबाबत निर्देश देण्यासाठी केरळ क्रिकेट संघटनेने (केसीए) बीसीसीआयला पत्र लिहिले आहे.२०१३च्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे ही बंदी उठविली असल्याने केसीएने हे पाऊल उचलले. ‘मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज असल्याचे श्रीसंतने केरळ संघटनेला कळविले आहे. स्थानिक क्रिकेट मोसमाला सुरुवात होणार असून केसीए देखील श्रीसंतला मदत करण्यास इच्छूक आहे. शिबिर आणि तयारी सत्रात श्रीसंतला संधी देण्याचा केसीएचा विचार आहे. तथापि त्याआधी सीओए आणि बीसीसीआयची परवानगी अनिवार्य असेल. केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी श्रीसंतवरील आजीवन बंदी उठविताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याचा सहभाग असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे स्पष्ट केले. न्या. ए मोहम्मद मुश्ताक यांनी बीसीसीआयकडून श्रीसंतविरुद्ध करण्यात आलेली सर्वच कारवाई रद्दबातल केली. निकालानंतर आनंदी झालेल्या श्रीसंतने क्रिकेटमधील ‘दुसºया इनिंग’ला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यासाठी केरळ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. श्रीसंत पुन्हा केरळ संघात दिसावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही केसीएने आधीच दिले आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- श्रीसंतचा निर्णय घ्या; केसीएचे बीसीसीआयला पत्र
श्रीसंतचा निर्णय घ्या; केसीएचे बीसीसीआयला पत्र
स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छिणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याच्याबाबत निर्देश देण्यासाठी केरळ क्रिकेट संघटनेने (केसीए) बीसीसीआयला पत्र लिहिले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:47 AM