रोहितला कर्णधार नेमण्याचा निर्णय योग्यच : रवी शास्त्री

Ravi Shastri : विराटच्या जागी रोहित शर्मा याला वन डे, तसेच  टी-२० संघाचा कर्णधार नेमण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे मत त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:06 AM2021-12-27T08:06:55+5:302021-12-27T08:07:05+5:30

whatsapp join usJoin us
The decision to appoint Rohit as captain is right: Ravi Shastri | रोहितला कर्णधार नेमण्याचा निर्णय योग्यच : रवी शास्त्री

रोहितला कर्णधार नेमण्याचा निर्णय योग्यच : रवी शास्त्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या नेतृत्वावरून वाद सुरू असतानाच माजी मुख्य कोच रवी शास्त्री  यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले. विराटच्या जागी रोहित शर्मा याला वन डे, तसेच  टी-२० संघाचा कर्णधार नेमण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे मत त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
शास्त्री म्हणाले, ‘माझ्या मते, कसोटी आणि वन डे प्रकारात दोन वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा निर्णय योग्य आहे.  सध्याची वेळ देखील अशीच आहे की एक खेळाडू तीनही प्रकारात संघाचे नेतृत्व करू शकत नाही. बीसीसीआयचा हा निर्णय विराट आणि रोहित या दोघांसाठीही उपयुक्त ठरला आहे.’
 विराटने आता खेळावर पूर्ण लक्ष द्यायला हवे, अशी सूचना करताना शास्त्री म्हणाले, ‘विराट कोहली आता कसोटी क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो.  विराट जोपर्यंत चांगली कामगिरी करीत राहील तोपर्तंत तो कसोटीत देशाचे नेतृत्व करू शकतो. वन डे संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे विराटला भरपूर संधी असेल. त्याच्याकडे आणखी ५-६ वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये देदीप्यमान कामगिरीसाठी शिल्लक आहेत.’ 
शास्त्री यांच्या मते, रोहितचे नेतृत्व सुनील गावसकर यांच्यासारखे आहे.  तो संतुलित वागतो. शिवाय       शांतचित्त कर्णधार आहे.  कोहली मात्र कपिल देव यांच्यासारखा आहे.  तो मैदानावर आधारित घटनांवर निर्णय घेतो. विराटच्या आक्रमकतेमुळे भारताने कसोटीत बरीच मजल गाठली आहे.

Web Title: The decision to appoint Rohit as captain is right: Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.