कटक : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात एका नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने या खेळाडूना पदार्पणाची कॅप दिल्याचे पाहायला मिळाले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना कटक येथे होणार आहे.
कटकच्या खेळपट्टीवर नवीन वेगवान गोलंदाजाला यावेळी संधी देण्याचे भारताने ठरवले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.
आत्मविश्वासाने खेळणाऱ्या भारतीय संघापुढे आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना जिंकून सलग दहावा द्विपक्षीय मालिका विजय साजरा करण्याची मोठी संधी असेल. विंडीजने चेन्नईतील पहिला सामना जिंकला होता. विशाखापट्टणममध्ये मात्र भारताने १०७ धावांनी मात देत १-१ अशी बरोबरी साधली होती.
दुसºया सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी २२० धावांची भागीदारी करीत शतकेही झळकवली. या खेळीमुळे राहुलने संघातील स्थान देखील निश्चित केले. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनीही धावा केल्या. तिसºया सामन्यासाठी जखमी दीपक चाहरऐवजी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला स्थान देण्यात आले आहे. क्षेत्ररक्षणात मात्र भारताची लौकीकानुसार कामगिरी झालेली नाही. सामन्यानंतर कोहलीने देखील याची कबुली देत या क्षेत्रास सुधारणेस वाव असल्याचे सांगितले होते.बाराबती स्टेडियमची खेळपट्टी देखील विशाखापट्टणमसारखी फलंदाजीला अनुकूल वाटते. दुसºया सामन्यात हेटमायर आणि होप यांनी चेन्नईत मनसोक्त फटकेबाजी केली, पण दुसºया सामन्यात दोघेही अपयशी ठरल्यामुळे भारताचा विजय सोपा झाला होता. पाहुण्या संघाचा कर्णधार कीरोन पोलार्ड याने पहिल्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले होते. येथेही दवबिंदूची अडचण टाळण्यासाठी हा संघ धावांचा पाठलाग करण्याचाच प्रयत्न करणार असे दिसते. विंडीजने हा सामना जिंकल्यास भारतात १३ वर्षानंतर द्विपक्षीय मालिका विजयाचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. यंदा मार्चमध्ये आॅस्ट्रेलियाकडून मालिकेत पराभूत झालेल्या भारताने सलग १५ वर्षे द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही, हे विशेष.
भारताची गोलंदाजी जगात सर्वोत्कृष्ट : डेल स्टेनजोहान्सबर्ग : द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने भारताचा सध्याचा मारा जगात सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. स्टेन हा यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार आहे. संघाने त्याला दोन कोटी या मूळ किमतीत खरेदी केले. टिष्ट्वटरवर स्टेनने विविध पैलूंवर मत व्यक्त केले.सध्या कोणत्या संघाकडे जगात सर्वोत्कृष्ट मारा आहे, असा सवाल करताच स्टेन म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजी जगात सर्वोत्कृष्ट आहे.’ आॅस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा आपला आवडीचा गोलंदाज आहे, असेही स्टेन म्हणाला. आगामी आयपीएलमध्ये खेळण्यास मी फारच उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. स्टेनने आयपीएलमध्ये ९२ सामने खेळले आहे.
विराट कोहलीला कामगिरी सुधारण्याची संधीच्भारताचा कर्णधार विराट कोहली याला आज रविवारी येथील बाराबती स्टेडियमवर तिसºया वन डेत रेकॉर्ड सुधारण्याची संधी असेल. येथे विराटने तिन्ही प्रकारात चार सामन्यात केवळ ३४ धावा केल्या आहेत.च्आजच्या सरावात कोहलीने बराच वेळ घाम गाळला. फलंदाजीदरम्यान त्याने मैदानी आणि डोक्यावरुन उत्तुंग फटके मारले. कोहलीने विंडीजविरुद्ध चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे क्रमश: चार आणि शून्य धावा केल्या.च्विराटने येथे तीन वन डे तसेच एक टी-२० सामना खेळला असून त्यात ३, २२,१ आणि ८ धावा केल्या. त्याने भारतातील जितक्या मैदानांवर किमान तीन सामने खेळले ते पाहता विराटची ही सर्वांत खराब कामगिरी आहे.लंकेविरुद्ध २०१७ मध्ये येथे झालेल्या टी-२० सामन्यात भाग घेतला नव्हता. आज त्याने अर्धा तास फलंदाजीचा सराव केला. सायंकाळी पडणाºया दवबिंदूबाबत त्याने चिंता व्यक्त केली. क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात त्याने ओल्या चेंडूने सराव केला.