Join us  

'गब्बर'नंतर भारताचा आणखी एक खेळाडू जायबंदी; विंडीजविरुद्धच्या मालिकेला मुकणार?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:46 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक ठरला. कोलकाताच्या इडन गार्डनवर टीम इंडियानं प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळला आणि अवघ्या अडीच दिवसांत तो जिंकलाही. भारतानं हा सामना एक डाव व 46 धावांनी जिंकला. भारतानं या विजयासह सलग चार कसोटी सामन्यांत डावानं विजय मिळवण्याचा विक्रम नावावर केला. या मालिकेनंतर टीम इंडिया मर्यादित षटकांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. पण, या मालिकेपूर्वीच सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली आणि त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यात आणखी एका प्रमुख खेळाडूची भर पडली आहे.

बांगलादेशनंतर भारतीय संघ 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने माघार घेतली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेच्या सामन्यात धवननं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं आणि आता विंडीज मालिकेत त्याच्या जागी संघात संजू सॅमसनचा समावेश करून घेतला.  

मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत बुधवारी सुपर लीगच्या A गटात राजस्थान आणि दिल्ली यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक चहरच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात दीपक चहरचा समावेश आहे. ही मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि आजच्या दुखापतीमुळे विंडीजविरुद्ध त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. तसे झाल्यास नवदीप सैनी किंवा खलील अहमद यांना संधी मिळू शकते.

भारतीय गोलंदाज दीपक चहरचा फलंदाजीत विक्रम; संजू सॅमसनशी बरोबरीराजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपकनं षटकारांची आतषबाजी केली आणि संजू सॅमसन व नितीश राणा या ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनबीसीसीआयराजस्थानदिल्ली