दुबई : बांगलादेशविरुद्ध ७ धावांत ६ बळी घेत विश्वविक्रम करणारा भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरने ८८ स्थानांची झेप घेत आयसीसी टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत ४२ व्या स्थानी कब्जा केला. या यादीमध्ये फिरकीपटूंचे वर्चस्व असून आघाडीचे पाच गोलंदाज आणि अव्वल ९ पैकी ८ गोलंदाज फिरकीपटू आहेत. न्यूझीलंडचा मिशेल सँटनर अफगाणिस्तानच्या राशिद खाननंतर दुसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.बांगलादेशविरुद्ध तिसºया सामन्यात चाहर टी२० क्रिकेटमध्ये हॅट््ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यामुळे भारताला यंदाच्या मोसमात मायदेशात पहिली टी२० मालिका जिंकण्यात यश मिळाले. अन्य गोलंदाजांमध्ये कृणाल पांड्याने (संयुक्त १८ व्या) सहा, यजुवेंद्र चहलने (२५ व्या) नऊ व वाशिंग्टन सुंदरने (२७ वे स्थान) २१ स्थानांची प्रगती केली आहे.भारताचा अव्वल फलंदाज म्हणून रोहित शर्मा कायम आहे. तो सातव्या स्थानी कायम असून लोकेश राहुल आठव्या स्थानी पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करीत असलेल्या शिखर धवनची १२ व्या, मालिकेत न खेळणारा विराट कोहलीची १५ व्या आणि फॉर्मात नसलेला रिषभ पंतची ८९ व्या स्थानी घसरण झाली आहे.इंग्लंडच्या डेव्हिड मलानने फलंदाजी क्रमवारीत तिसºया स्थानी जागा मिळवली आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आजम अव्वल आणि आॅस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच दुसºया स्थानी आहे. बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद नईम संयुक्त ३८ व्या स्थानी दाखल झाला आहे. त्याने या मालिकेतील तीन सामन्यांत १४३ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दीपक चाहरने केली ८८ स्थानांची प्रगती, फलंदाजांमध्ये रोहित सातव्या स्थानी कायम
दीपक चाहरने केली ८८ स्थानांची प्रगती, फलंदाजांमध्ये रोहित सातव्या स्थानी कायम
विश्वविक्रम करणारा भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरने ८८ स्थानांची झेप घेत आयसीसी टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत ४२ व्या स्थानी कब्जा केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 4:08 AM