Deepak Chahar, CSK, IPL Auction 2022: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर याला चेन्नईच्या संघाने कोट्यवधींची बोली लावत विकत घेतले. दीपक चहरने टीम इंडियाकडून खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. त्याने दक्षिण आफ्रिकेत दमदार अर्धशतकी खेळी केली होती. तर वेस्ट इंडिजविरूद्ध तिसऱ्या वन डे सामन्यातही त्याने ३८ धावांची खेळी केली होती. गोलंदाजीतही त्याने आपली चमक दाखवली होती. त्यामुळे टीम इंडियाचा दमदार हिरो दीपक चहर याला चेन्नईने कोट्यवधींची बोली लावून विकत घेतले.
कितीची लागली बोली? - दीपक चहर गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला महालिलावाआधी करारमुक्त करण्यात आले. त्यामुळे चेन्नईचा संघ त्याच्यावर बोली लावेल अशी अपेक्षा नव्हती. पण मूळ ८० लाखांच्या रकमेवरून त्याची बोली सुरू झाली आणि बोली वाढवण्यास सुरूवात झाली. अखेर दीपक चहरला तब्बल १४ कोटींच्या बोलीवर चेन्नईच्या संघानेच पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.