Deepak Chahar : गड आला पण...!; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:10 AM2022-02-21T11:10:29+5:302022-02-21T11:11:10+5:30

whatsapp join usJoin us
Deepak Chahar sustains hamstring pull, looks doubtful for Sri Lanka series | Deepak Chahar : गड आला पण...!; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत

Deepak Chahar : गड आला पण...!; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली. सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, दीपक चहर, शार्दूल ठाकूर यांनी तिसऱ्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने एकहाती झुंज दिली, परंतु तो विंडीजला भारत दौऱ्यावर पहिला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताने ही मालिका जिंकली, परंतु त्यांचा प्रमुख गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याने १.५ षटक फेकल्यानंतर मैदान सोडले होते. आता २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चहरचे खेळणे अनिश्चित आहे.

इंडियन प्रीमिअऱ लीगच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटी रुपये मोजून चहरला आपल्या ताफ्यात कायम राखण्यात यश मिळवले. त्यानंतर विंडीजविरुद्धच्या मालिकेत चहरने चांगली कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात पहिल्याच षटकात त्याने कायल मेयर्सची विकेट घेतली आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात ब्रेंडन किंग्सला माघारी पाठवले. पण, त्याच्या दुसऱ्या षटकाचा  सहावा चेंडू टाकताना तो अचानक थांबला. त्याच्या मांडिचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो मैदानावर बसला आणि त्यानंतर त्याने मैदान सोडले. तो पुन्हा मैदानावर उतरला नाही.

भारत-श्रीलंका यांच्यातली तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि आता त्यात दीपकचे खेळणे अनिश्चित झाले आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत  तंदुरुस्त होण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.  

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)

भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान

सुधारित वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौ
दुसरी ट्वेंटी-२० -  २६ फेब्रुवारी, धर्मशाला
तिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशाला
पहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहाली
दुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट),  बंगळुरू 
 

Web Title: Deepak Chahar sustains hamstring pull, looks doubtful for Sri Lanka series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.