IPL 2022 LSG vs GT Live Updates: गुजरात टायटन्स विरोधातील पहिल्यावहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने २० षटकांत ६ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) लखनौच्या (Lucknow Super Giants) आघाडीच्या फलंदाजांना माघारी पाठवून गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) सामन्यावर पकड मिळवून दिली होती. पण, दीपक हुडा (Deepak Hooda) व आयूष बदोनी (Ayush Badoni) यांनी लखनौला दमदार खेळी करून दिली. दीपक हुडाच्या दमदार खेळीनंतर मुंबईकर रणजीपटू वासिम जाफर (Wasim Jaffer) याने त्याच्या खेळीचं कौतुक करताना बॉलिवूड स्टार बॉबी देओलचा सोल्जर चित्रपटातील फोटो वापरला.
मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेत लखनौची अवस्था ४ बाद २९ अशी केली होती. कर्णधार लोकेश राहुल (०), क्विंटन डी कॉक (७), एव्हिन लुईस (१०) व मनीष पांडे (६) हे झटपट माघारी परतले. त्यानंतर दीपक हुडाने लखनौकडून ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा केल्या. त्याच्या खेळीचं कौतुक करताना जाफरने भन्नाट फोटो वापरला. गुजरात महत्त्वाचे समजून लखनौचे वरच्या फळीतील फलंदाज बाद केले. पण दीपक हुडा हा बॉबी देओलच्या लपवलेल्या हातासारखा ठरला, अशी धमाल पोस्ट त्याने केली.
दरम्यान, शमीने ४ षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. दीपक हुडा बाद झाल्यावर बदोनीने लढा सुरू ठेवत शमीच्या १८व्या षटकात १५ धावा कुटल्या. बदोनीने षटकार खेचून पदार्पणातील अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. त्यामुळे लखनौला ६ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारता आली.
Web Title: Deepak Hooda IPL 2022 t20 LSG vs GT Live Updates Wasim Jaffer Shares Comedy Memes of Bollywood Movie Soldier Bobby Deol
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.