नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना पार पडत आहे. भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. आजच्या सामन्यात विडिंजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा संघ चीतपट झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 बळी घेऊन नव्या विक्रमाला गवसणी घातली.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारीत 20 षटकांत 6 विकेट गमावून 118 धावा केल्या. स्टॅफनी टेलर (42) आणि शेमेन कॅम्पबेल (30) व्यतिरिक्त कोणत्याच विडिंजच्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे भारताकडून ट्वेंटी-20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी घेण्याचा विक्रम दीप्ती शर्माने केला आहे.
दीप्ती शर्माने रचला इतिहास
ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय खेळाडू -
- दीप्ती शर्मा - 100 बळी
- पूनम यादव - 98 बळी
- राधा यादव - 67 बळी
- राजेश्वरी गायकवाड - 50 बळी
- झुलन गोस्वामी - 56 बळी
वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"