Deepti Sharma Charlie Dean, Mankading Controversy: भारतीय महिला संघाने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा संस्मरणीय विजय मिळवला. मालिकेतील तिसर्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयापेक्षा 'मंकडिंग'चीच जास्त चर्चा होती. त्या सामन्यात दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाज शार्लोट डीन हिला मंकडिंग पद्धतीने रन-आऊट केले. दीप्ती शर्माने घेतलेली विकेट ICCच्या नवीन नियमांनुसार पूर्णपणे योग्य ठरले. पण इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याला खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले. पण आता एक नवीन आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या टीकाकारांची नक्कीच बोलती बंद होईल.
क्रीडा समीक्षक आणि पत्रकार पीटर डेला पेनियाने इंग्लिश खेळाडूंना या साऱ्या गोंधळात आरसा दाखवला आहे. पेनियाने ट्विट केले, "शार्लोट डीनने नॉन-स्ट्रायकरची क्रीज गोलंदाज बॉल टाकण्याच्या आधी सोडण्याची ७३वी वेळ होती. त्यावेळी ती बाद झाली. शार्लोट डीनने आपल्या खेळीमध्ये तब्बल ८५ टक्के चेंडूंच्या वेळी बॉल टाकण्याआधीच नॉन-स्ट्रायकरची शेवटी क्रीज सोडली होती. मुळात थोडक्यात सांगायचे तर एका ओव्हरमध्ये ती जवळपास ५ वेळा क्रीजच्या बाहेर जात होती."
--
--
--
या दरम्यान पेनियाने बरेच स्क्रीनशॉट शेअर केले आणि इंग्लिश फलंदाज शार्लोट डीनच्या चुकीबद्दल सांगितले. सामन्याच्या १८व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चार्ली डीनची क्रीजमधून बाहेर पडण्याची सुरुवात झाली. चार्लीने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्याचे स्क्रीनशॉटमध्ये स्पष्टपणे दिसून आले. या दरम्यान तिने गोलंदाजाकडे लक्षही दिले नाही. यानंतर, इंग्लंडच्या विकेट्स पडत राहिल्याने चार्ली डीन चेंडू टाकण्याआधीच क्रीझच्या पुढे जात होता. जेव्हा शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिस फलंदाजीला आली, तेव्हा डीन क्रीजपासून दोन फूट पुढे होती. विशेष बाब म्हणजे शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिसही चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजमध्येच थांबली होती, पण चार्ली डीनच्या वतीने ही चूक वारंवार केली जात होती.
--
--
--
--
क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या MCC ने नॉन स्ट्रायकिंग एंडवर उभ्या असलेल्या फलंदाजांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, 'बॉलिंग एंडवर असलेल्या फलंदाजांने, जोपर्यंत गोलंदाजाच्या हातातून चेंडू निघत नाही, तोपर्यंत क्रीजवरच थांबायचे आहे.' पण डीनने त्या नियमाचे पालन न करत तब्बल ७२ वेळा क्रीजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अखेर ७३व्या वेळी तिला त्या चुकीचा मोठा फटका बसला आणि इंग्लंडच्या संघाने सामना गमावला.