दीप्ती शर्माने दाखवले धोनीसारखे तेवर! शेवटच्या क्षणी मारलेल्या सिक्सरनं संघ ठरला चॅम्पियन

सामना अगदी रंजक स्थितीत पोहचला असताना मोक्याच्या क्षणी दीप्तीच्या भात्यातून आला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:03 PM2024-08-19T13:03:14+5:302024-08-19T13:11:19+5:30

whatsapp join usJoin us
Deepti Sharma Hit Six London Spirit Won The Hundred Women Watch Video | दीप्ती शर्माने दाखवले धोनीसारखे तेवर! शेवटच्या क्षणी मारलेल्या सिक्सरनं संघ ठरला चॅम्पियन

दीप्ती शर्माने दाखवले धोनीसारखे तेवर! शेवटच्या क्षणी मारलेल्या सिक्सरनं संघ ठरला चॅम्पियन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 'द हंड्रेड' स्पर्धेतील फायनल मारत लंडन स्पिरिट महिला संघ नवा चॅम्पियन ठरला आहे. या संघाला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून देण्यात भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकात दमदार फटकेबाजी करत तिने संघाचा विजय सहज सोपा केला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या रोहर्षक लढतीत दीप्ती शर्मानं धोनी स्टाईलमध्ये खास तेवर दाखवत मॅच संपवली. तिनं षटकार मारला आणि तिचा संघ त्या सिक्सरच्या जोरावर चॅम्पियनही ठरला. 

लॉर्ड्सच्या मैदानात रंगली होती फायनल

लंडन स्पिरिट आणि वेल्श फायर या दोन महिला संघांनी   यंदाच्या 'द हंड्रेड' हंगामातील फायनल गाठली होती. लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात वेल्श फायर संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १०० चेंडूत ८ विकेट्सच्या मोबदल्यात ११५ धावा केल्या होत्या. दीप्तीच्या फटकेबाजीच्या जोरावर लंडन स्पिरिट महिला संघाने हा सामना २ चेंडू आणि ४ विकेट्स राखून जिंकला. 

पहिल्यांदाच चॅम्पियन ठरला हा संघ 

'द हंड्रेड' स्पर्धेतील महिला गटात लंडन स्पिरीट संघाने पहिल्यांदाच जेतेपद मिळवले आहे. फायनल लढतीत लंडन स्पिरिट संघाकडून विकेटकीपर बॅटर जॉर्जिया रेडमेयने हिने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. याशिवाय कॅप्टन हीथर नाइट हिने २४ धावांचे योगदान दिले.  डेनिअल गिब्सनं  ९ चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने २२ धावांची झंजावत खेळी केली. दीप्तीनं या सामन्यात १६ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. 

३ चेंडूत ४ धावांची होती गरज

अखेरच्या ३ चेंडूत लंडन स्पिरिट संघाला ४ धावांची गरज होती. सामना अगदी रंगतदार स्थितीत पोहचला होता. एक निर्धाव चेंडू दबाव वाढवणारा ठरू शकला असता. या परिस्थितीत गोलंदाजसह बॅटरच्या मनात एक वेगळाच खेळ सुरु असतो. जो दबाव बाजूला ठेवून खेळ करतो तो बाजी मारतो. अगदी दीप्तीनं हेच केलं. तिने उत्तुंग फटका मारत धोनीच्या स्टाईलमध्ये मॅच संपवली. 

फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही दाखवली चमक

दीप्तीनं मोक्याच्या क्षणी बिनधास्त फटकेबाजीसह आपल्या संघाला चॅम्पियन करण्यात मोलाचा वाटा तर उचललाच. याशिवाय तिने गोलंदाजीवेळीही छाप सोडली. २० चेंडूत २३ धावा खर्च करून तिने एक विकेटही घेतली. चॅम्पियन कॅप्टन हीथर नाइट हिने दीप्तीवर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडूनं चांगली कामगिरी केली, असे ती म्हणाली.

Web Title: Deepti Sharma Hit Six London Spirit Won The Hundred Women Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.