Deepti Sharma Mankading, IND vs ENG: "तुम्ही खेळभावनेबद्दल बोलूच नका.."; Video ट्वीट करत इंग्लंडच्या क्रिकेटर्स भारतीय फॅन्सने झापलं...

Deepti Sharma Mankading, Spirit of Cricket, IND vs ENG: इंग्लंडने केलेली 'चिटींग' भारतीय चाहत्यांनी ट्वीटवरच दाखवली..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:21 PM2022-09-26T18:21:28+5:302022-09-26T18:22:39+5:30

whatsapp join usJoin us
Deepti Sharma Mankading Spirit of Cricket debate in IND vs ENG Team India fans slams England players with old cheating video | Deepti Sharma Mankading, IND vs ENG: "तुम्ही खेळभावनेबद्दल बोलूच नका.."; Video ट्वीट करत इंग्लंडच्या क्रिकेटर्स भारतीय फॅन्सने झापलं...

Deepti Sharma Mankading, IND vs ENG: "तुम्ही खेळभावनेबद्दल बोलूच नका.."; Video ट्वीट करत इंग्लंडच्या क्रिकेटर्स भारतीय फॅन्सने झापलं...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Deepti Sharma Mankading, Spirit of Cricket, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये रंगलेल्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने ३-०ने विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या. दीप्ती शर्माच्या नाबाद ६८ आणि स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा डाव १५३ धावांतच आटोपला. रेणुका सिंगने ४ गडी टिपले. इंग्लंडकडून चार्ली डीन हिने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तिच्याच विकेटवरून मोठा वादंग झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांनी इंग्लिश महिला क्रिकेटपटूंना जुना व्हिडीओ ट्वीट करून चांगलंच झापलं.

नक्की काय घडलं प्रकरण?

भारतीय संघाने इंग्लंडला १७० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला सुरूवातीपासूनच लय सापडत नव्हती. आपल्या समृद्ध कारकिर्दीचा शेवटचा सामना खेळत असलेल्या झुलन गोस्वामीने गोलंदाजीने इंग्लंडला बांधून ठेवले. दुसरीकडून रेणुका सिंग ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी केली. झुलनने १० षटकांत ३० धावा देऊन २ बळी टिपले. तर रेणुकाने १० षटकांत २९ धावा देत ४ महत्त्वाचे मोहरे बाद केले. चार्ली डीन एकाकी झुंज देत शेवटपर्यंत उभी होती. ती ४७ धावांवर असताना इंग्लंडला ३९ चेंडूत १७ धावांची गरज होती. ती नॉन-स्ट्राइकवर असताना, चेंडू टाकण्याआधीच धावली. त्यामुळे दीप्ती शर्माने तिला मंकडिंग पद्धतीने धावबाद केले. त्यामुळे भारताने सामना जिंकला.

इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंना मात्र हा प्रकार रुचला नाही. त्यामुळे त्यांनी यावर टीका करत, 'क्रिकेटमधील खेळभावनेचा' बाबत धडे देण्यास सुरूवात केली. यावर काही भारतीय चाहत्यांनी काही जुने Video पोस्ट करत इंग्लंडला आरसा दाखवला. तसेच, 'तुम्ही क्रिकेटमधल्या खेळभावनेबाबत बोलूच नका', अशा आशयाची ट्वीट्सदेखील केली.

इंग्लंडची विकेटकिपर कॅच सोडूनही अपील करत होती. रिप्ले मध्ये सत्य उघड झाल्यावर फलंदाजाला Not Out देण्यात आले (Video)-

--

इंग्लंडच्या गोलंदाजाने विरोधी फलंदाजाला धक्का मारला. त्यानंतर फलंदाज पडलेला असताना त्याला इंग्लंडच्या खेळाडूने Run Out केले (Video)-

--

दीप्ती शर्माला नावं ठेवणारा स्टुअर्ट ब्रॉड, बॅटला लागून बॉल कॅच पकडल्यानंतरही मैदानात वाद घालत होता (Video)-

दरम्यान, अनेकांनी दीप्ती शर्माच्या बाजूनेही मत मांडले. खेळाच्या नियमानुसार जर एखादा खेळाडू वागत असेल, तर त्यात गैर काय, असे म्हणत तिच्या कृत्याचे समर्थन केले.

Web Title: Deepti Sharma Mankading Spirit of Cricket debate in IND vs ENG Team India fans slams England players with old cheating video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.