Join us  

विराट कोहली, केन विलियम्सन यांच्यासारखे 'सतर्क' राहा; Ian Bishop यांचा नॉन स्ट्रायकरवरील फलंदाजांना सल्ला

वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू इयान बिशॉप ( Ian Bishop) यांनी नॉन स्ट्रायकरवर असलेल्या फलंदाजांना सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:21 AM

Open in App

वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू इयान बिशॉप ( Ian Bishop) यांनी नॉन स्ट्रायकरवर असलेल्या फलंदाजांना सल्ला दिला आहे. विराट कोहली व केन विलियम्सन या दिग्गजांसारखे गोलंदाज व  चेंडू यांच्यावर लक्ष ठेवा, असे ते म्हणाले. भारतीय महिला गोलंदाज दीप्ती शर्माने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात मांकडिंग केले आणि त्यावरून या चर्चेला सुरूवात झाली. दीप्तीने नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या चार्लोट डीनला मांकडिंग रन आऊट केले. दीप्तीने चेंडू टाकण्याआधीच डीनने क्रिज सोडली होती आणि  त्यानंतर दीप्तीने तिला रन आऊट केले. जे नियमानुसार योग्य होते.     

पाकिस्तानचा फिक्सर देतोय नैतिकतेचे धडे! दीप्ती शर्माला 'चिटर' म्हणणाऱ्या Mohammad Asifवर टीका

''सरळ-सोपं आहे. विराट कोहली व केन विलियम्सन हे जसे नॉन स्ट्रायकर एंडला असताना गोलंदाजावर व तो चेंडू टाकण्याकडे लक्ष ठेऊन असतात, तसेच लक्ष सर्वांनी ठेवायला हवे. युवा खेळाडूंना या दोन दिग्गजांकडून हेही शिकायला हवं. रनींग बिटवीन दी विकेट ही कला आहे. गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच फलंदाज क्रिज सोडून अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात, परंतु ते करताना ते निष्काळजीपणे वागतात किंवा अयोग्य फायदा उचलण्याचा किंवा ते आळशी असतात,''असेही बिशॉप म्हणाले.  

दीप्ती शर्माने कसे बाद केले ?१६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ९ फलंदाज ११८ धावांत माघारी परतले होते. त्यानंतर चार्लोट डीन हिने अखेरच्या सहकाऱ्यासह ३५ धावा जोडत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. दीप्ती शर्मा हिने ४४ व्य षटकात डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले आणि इंग्लंडच्या झुंजीवर पाणी फिरवले. ४४ व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी दीप्ती शर्मा हिने बॉलिंग मार्कवरून धावण्यास सुरुवात केली असतानाच यष्ट्यांजवळ आल्यावर नॉन स्ट्राईकवर असलेली डीन ही लाईनच्या बाहेर असल्याचे दीप्तीला दिसले आणि तिने संधी साधून मागे वळत बेल्स उडवून डीनला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले.  नव्या बदलानुसार अशा पद्धतीने बाद करण्यास आयसीसीने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे डीन बाद ठरली.  

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीकेन विल्यमसन
Open in App