वडोदरा : यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३३२ ही मोठी धावसंख्या उभारणाऱ्या आॅस्ट्रेलियन संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाला मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ९७ धावांनी मात दिली आणि मालिकेवर ३-० असा विजय मिळवला.
हिली हिने ११५ चेंडूतच १७ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १३३ धावांची खेळी केली. त्याशिवाय राचेल हेन्स (४३) एशलीग गार्डनर (३५), बेथ मुनी (३४), एलिसा पेरी(३२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने ३३२ धावा केल्या. भारताची मधली फळी पुन्हा अपयशी ठरल्याने पूर्ण संघ ४४.४ षटकांत २३५ धावांवर बाद झाला. सलामीवीर स्मृती मानधना हिने ४२ चेंडूत ५२ धावांचा तडाखा दिला. मात्र, त्यानंतर अन्य कोणतीही फलंदाज चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या धावसंख्येत करू शकली नाही. आॅस्ट्रेलियाच्या गार्डनर हिने तीन, तर मेगान स्कट आणि पॅरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ही मालिका आयसीसी चॅम्पियनशिपचा भाग होती. त्यात आॅस्ट्रेलियाने तीन सामने जिंकून सहा गुण मिळवले. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक :
आॅस्टेÑलिया महिला : ५० षटकात ७ बाद ३३२ धावा (अलिसा हिली १३३, रचेल हेन्स ४३; हरमनप्रीत कौर २/५१) वि. वि. भारत महिला : ४४.४ षटकात सर्वबाद २३५ धावा (स्मृती मानधना ५२, जेमिमा रॉड्रिग्ज ४२; अॅश्ले गार्डनर ३/३९, एलिस पेरी २/४०, मेगन स्कट २/५४)
मानधना आणि युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (४२) यांनी पहिल्या गड्यासाठी १३.४ षटकांत १०१ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र या दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर भारतीय संघ मोठी कामगिरी करू शकला नाही.
कर्णधार मिताली राज (२१), हरमनप्रीत कौर(२५), दीप्ती शर्मा (३६) आणि सुषमा वर्मा(३०)या नियमित अंतराने बाद झाल्याने भारतीय संघ पराभूत झाला.
या आधी आॅस्ट्रेलियाचा डाव हिलीने गाजवला. निकोल बोल्टन (११) आणि कर्णधार मेग लेनिंग (१८) लवकर बाद झाल्याने हिलीने पॅरीसोबत तिसºया विकेटसाठी ७९ आणि हेन्ससोबत चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली.
Web Title: The defeat of the Indian women, the 3-0 sweep sweep by Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.