इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वाला १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स व माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानं सुरूवात होणार आहे. यूएईत पार पडणाऱ्या दुसऱ्या पर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार आहे. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचा कल्ला होणार आहे. बीसीसीआयनं यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं प्रेक्षकांना सॅल्यूट करण्यासाठी बुधवारी नवं मराठमोळं गाणं लाँच केलं... त्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांनी मराठी गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. धाडस कुणचं? आपल्या फॅमिलिचं, सन्मान कुणाचा? आपल्या फॅमिलिचा!; या थीमवर हे गाणं आधारित आहे.
मुंबई इंडियन्स ( ७ सामने, ४ विजय, ३ पराभव, ८ गुण) Mumbai Indiansमुंबई इंडियन्ससाठी हे काही नवीन नाही, सुरूवातीला स्पर्धेबाहेर जाणार असे वाटत असताना हा संघ कधी गरूड भरारी घेतो अन् थेट फायनलला प्रवेश करतो हे कोडंच आहे. क्विंटन डी कॉकचा हरवलेला फॉर्म परत येणे ही संघासाठी चांगली बातमी आहे. रोहित शर्मा सातत्यानं त्याची भूमिका चोख बजावत आहे. सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी मागच्या वर्षी जी हवा केली होती, ती यंदा गायब झाल्याचे चित्र आहे. कृणाल व हार्दिक या पांड्या ब्रदर्सना MI आणखी किती पोसणार हा सवाल, आता प्रत्येक जण विचारू लागला नाही. दोघांनाही अपेक्षांवर खरं उतरता आलेलं नाही. त्यामुळे किरॉन पोलार्डवर मोठा भार पडतोय आणि तो सक्षमपणे तो पेलवतोयही.. गोलंदाजीत राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांची कामगिरी समाधानकारक झालेली आहे.
पाहा व्हिडीओ
Mumbai Inidian Matches Schedule :
19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
मुंबई इंडियन्सचा संघ ( IPL 2021 Mumbai Indians squad) - रोहित शर्मा, अॅडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जिमी निशॅम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जासेन, मोहसीन खान, नॅथन कोल्टर नायल, पियूष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युधवीर सिंग