वेळेअभावी लोढा शिफारशींना विलंब

राज्य संघटनेच्या घटनेत बदल तसेच लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात येत असलेल्या अडचणींची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेचा प्रमुख सौरव गांगुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:21 AM2018-02-24T03:21:04+5:302018-02-24T03:21:04+5:30

whatsapp join usJoin us
Delay Lolland recommendations due to lack of time | वेळेअभावी लोढा शिफारशींना विलंब

वेळेअभावी लोढा शिफारशींना विलंब

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : राज्य संघटनेच्या घटनेत बदल तसेच लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात येत असलेल्या अडचणींची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेचा प्रमुख सौरव गांगुली व सौराष्टÑ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मधुकर वोरा यांनी बीसीसीआयला पत्राद्वारे दिली आहे.
बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी सर्व राज्य संघटनांना ई मेलद्वारे संविधान संशोधन केल्याची माहिती मागितली होती. याआधी १३ राज्य संघटनांनी लोढा शिफारशींचे पालन करण्याचा व त्याबाबतचे शपथपत्र देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सर्व संघटनांना देण्यात आली.
गांगुलीने म्हटले, ‘बंगाल संघटनेने यासंदर्भात नुकतीच सर्वसाधरण सभा बोलवली होती. त्यात लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे व सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देण्याची माहिती देण्यात आली. यासाठी सदस्यांनी आणखी एका विशेष साधारण सभेची मागणी केली आहे. मागच्या आठवड्यात आपला मेल मिळाला. तेव्हा सदस्यांना सर्व दुरुस्त्या समजावून सांगण्यास वेळ नव्हता. आपल्या वेळेच्या आत आम्ही संविधान दुरुस्ती करू शकणार नाही.’
वोरा म्हणाले, ‘सध्या सर्वोच्च न्यायालय लोढा समितीच्या शिफारशींवर अंमल करण्यासाठी दोन्ही वकिलांची बाजू ऐकण्यास तयार आहे. सुनावणी होईपर्यंत राज्य संघटना विचार करणार आहे.’

Web Title: Delay Lolland recommendations due to lack of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.