IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने इतिहास रचला. त्यांनी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले आणि LSG प्रथमच १६०+ धावांचा यशस्वी बचाव नाही करू शकले. सहा सामन्यांतील DC हा दुसराच विजय ठरला आणि ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. दिल्लीची गाडी घरंगळत असताना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली DCसाठी एक वाईट बातमी आली आहे. दुखापतीमुळे त्यांचा ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) मायदेशात परतला आहे आणि तो कदाचित आयपीएल २०२४ च्या हंगामातून पूर्णपणे बाहेर होऊ शकतो.
ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतला आहे आणि आता तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या देखरेखीखाली असणार आहे. आयपीएलनंतर जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मार्शला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिल्ली फ्रँचायझीशी बोलून त्याला मायदेशात परत बोलावले आहे.
मिचेल मार्श आतापर्यंत आयपीएल २०२४ हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी फक्त चार सामने खेळू शकला आणि त्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवली. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात बेंचवर बसला होता. त्याने चार सामन्यांमध्ये २०,२३,१८ आणि ० अशा धावा केल्या, तर एकच विकेट घेतली.
Web Title: Delhi Capitals allrounder Mitchell Marsh has returned to Australia to treat a partial tear in his right hamstring.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.