Join us  

रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार

कर्णधार रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 6:52 PM

Open in App

Delhi Capitals New Captain : IPL 2024 च्या प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी मोठा धक्का बसला. कर्णधार रिषभ पंत ( Rishab Pant) याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. रिषभने तीन सामन्यांत वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर एक सामन्याची बंदी व ३० लाखांचा दंड अशी कारवाई केली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रिषभ खेळणार नाही. DC व RCB हे दोन्ही संघ प्ले ऑफसाठी प्रयत्नशील आहेत आणि अशात रिषभचे नसणे दिल्लीसाठी टेंशन घेऊन येणारे आहे. मग, या सामन्यात दिल्लीचे नेतृत्व कोण करेल?

मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतसह सर्व खेळाडूंना झालीय शिक्षा  

७ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रिषभला पुन्हा एकदा वेळेत षटकं पूर्ण करता आलेली नाही. ही त्याची तिसरी चूक असल्याने त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि उर्वरित दोन सामने जिंकून त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत टीकता येणार आहे. रिषभच्या गैरहजेरीत अक्षर पटेल ( Axar Patel) DC चे नेतृत्व सांभाळेल असे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आझ जाहीर केले. 

शनिवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना पाँटिंग यांनी या वृत्ताची पुष्टी केली. पाँटिंग म्हणाले, “अक्षर पटेल उद्या आमचा कर्णधार असेल. साहजिकच तो गेल्या काही हंगामांपासून फ्रँचायझीचा उपकर्णधार होता. अक्षर हा आयपीएलचा अनुभवी खेळाडू असून त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही अनुभव आहे. तो खूप हुशार मुलगा आहे, खेळ चांगला समजतो.'' 

टॅग्स :आयपीएल २०२४रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सअक्षर पटेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर