दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होतेय... मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघात नेतृत्वबदल पाहायला मिळल आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:44 PM2024-03-20T12:44:47+5:302024-03-20T12:45:41+5:30

whatsapp join usJoin us
Delhi Capitals announce ‘fearless’ Rishabh Pant as captain for IPL 2024, he returns as DC leader | दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होतेय... मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघात नेतृत्वबदल पाहायला मिळल आहे. मुंबईने रोहित शर्माच्या खांद्यावरून कर्णधाराची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवली, तर हैदराबादने एडन मार्करामच्या जागी पॅट कमिन्स याला नवा कर्णधार जाहीर केले. दिल्ली कॅपिटल्सनेही आता कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. मागील पर्वात डेव्हिड वॉर्नर याने DC च्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती.


रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) पुनरागमनाने दिल्लीच्या संघात कर्णधारबदल होईल हे निश्चित होते. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर रिषभ पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे आणि दिल्लीने त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपद सोपवले आहे. १५ महिन्यानंतर तो आयपीएल २०२४ मध्ये कॅप्टन म्हणून मैदानावर उतरणार आहे.  


''IPL च्या आगामी हंगामात रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असणार आहे. १४ महिन्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. दिल्ली कॅटिपल्सच्या हंगामापूर्वीच्या सराव शिबिरात तो विशाखापट्टणम येथे संघासोबत आहे,''असे दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. रिषभ पंतने ९८ आयपीएल सामन्यांत २८३८ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व १५ अर्धशतकं आहेत. यष्टिंमागे त्याने ६४ झेल घेतले आहेत आणि १८ स्टम्पिंग केले आहेत. 


दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन व सहमालक पार्थ जिंदार म्हणाले, रिषभ पंतचे कर्णधार म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. धैर्य आणि निर्भयपणा हा त्याच्या क्रिकेटचा ब्रँड ठरला आहे.  आम्ही नवीन उत्कटतेने आणि उत्साहाने नवीन हंगामाची वाट पाहत असताना त्याला पुन्हा एकदा आमच्या संघातून खेळताना पाहण्यासाठी मी  आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.'' 


दिल्ली कॅपिटल्सचे वेळापत्रक

  • २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  • २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
     

Web Title: Delhi Capitals announce ‘fearless’ Rishabh Pant as captain for IPL 2024, he returns as DC leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.