नवी मुंबई : ‘पालघर एक्स्प्रेस’ म्हणून नावाजला गेलेल्या शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला १७ धावांनी नमवले. यासह दिल्लीने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. पंजाबचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर जितेश शर्माने केलेली झुंजार खेळी व्यर्थ ठरली. शार्दुलने मोक्याच्या वेळी ४ बळी घेत पंजाबची फलंदाजी खिळखिळी केली.
दिल्लीने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने आक्रमक सुरुवात केली. मात्र, चौथ्या षटकात जॉनी बेयरस्टो बाद झाला आणि पंजाबच्या फलंदाजीला गळती लागली. केवळ २९ धावांमध्ये ६ फलंदाज गमावल्याने पंजाबची १ बाद ५३ धावांवरून ७ बाद ८२ धावा, अशी अवस्था झाली. सातव्या षटकात मैदानात आलेल्या जितेशने १८ व्या षटकापर्यंत फटकेबाजी करत पंजाबच्या आशा कायम राखल्या होत्या. शार्दुलने चौथ्या आणि १८व्या षटकात दोन-दोन बळी घेत पंजाबला दडपणात आणले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले.
निर्णायक क्षण - शार्दुल ठाकूरने १८व्या षटकात जितेश शर्मा आणि कागिसो रबाडा यांना झेलबाद केले. येथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.
Web Title: delhi capitals beat punjab kings while maintaining their hopes of a play off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.