Join us  

IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार

GMR buys English Cricket Club: विशेष बाब म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच इंग्लिश क्रिकेट क्लब भारतीयांच्या ताब्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 10:06 PM

Open in App

GMR buys England Hampshire county cricket club: दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक असलेला GMR ग्रुप आणि हॅम्पशायर काउंटी यांच्यातील करारावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. इंग्लंडचा प्रसिद्ध हॅम्पशायर काउंटी क्लब आता परदेशी मालकी असलेला पहिला क्रिकेट क्लब बनला आहे. या करारांतर्गत, GMR ग्रुपची मूळ कंपनी असलेल्या GGPL ला काउंटीच्या मूळ कंपनी हॅम्पशायर स्पोर्ट्समध्ये ५३% हिस्सा मिळाला आहे. येत्या २ वर्षात GMR ग्रुप या क्लबचे १०० टक्के अधिग्रहण करणार आहे.

भारतीय कंपनीच्या ताब्यात इंग्लिश काऊंटी क्लब

GMR समूह ही एक भारतीय कंपनी आहे. त्यांची IPL संघ दिल्ली कॅपिटल्समध्ये ५० टक्के भागीदारी आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे प्रथमच इंग्लिश क्रिकेट क्लब भारतीयाच्या ताब्यात आला आहे. हॅम्पशायरचे माजी अध्यक्ष रॉब ब्रॅन्सग्रोव्ह यांनी ६० टक्के भागभांडवल विकल्यानंतर हा समूह क्लबमधील बहुसंख्य भागधारक बनला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने या कराराला अंतिम रुप देण्यात निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही वृत्त आहे.

GMR ग्रुपला काय फायदा होणार?

गार्डियनच्या अहवालानुसार, हा करार सुमारे १३ अब्ज रुपयांचा (£120 दशलक्ष) आहे. एकदा GMR समूहाने १०० टक्के ताबा घेतला की इंग्लंडच्या रोझ बाउल स्टेडियमचे मालकी हक्क GMR समूहाकडे येतील. २०२१च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या स्टेडियममध्येच खेळला गेला होता. २०११ पासून या स्टेडियममध्ये एकूण ७ सामने आयोजित करण्यात आले आहेत. येथे मर्यादित षटकांचे सामनेही आयोजित करण्यात येतात. क्रिकेट क्लबचे ऑन-साइट हिल्टन नावाचे हॉटेल देखील आहे. तसेच क्लबच्या मालमत्तेवर बाउंडरी लेक्स नावाचा गोल्फ कोर्सदेखील आहे. तसेच इतर अनेक प्रकल्प आहेत, त्यामुळे GMR ग्रुपला मोठा फायदा होऊ शकतो.

टॅग्स :आयपीएल २०२४कौंटी चॅम्पियनशिपइंग्लंडदिल्ली कॅपिटल्स