इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला. त्यामुळे ज्या खेळाडूंना वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळाले त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना संघात स्थान मिळाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि त्यात त्यांची आयपीएलमधील कामगिरी ही निराशाजनक होत आहे. हार्दिक पांड्याचे वर्ल्ड कप संघात नाव आहे, परंतु मुंबई इंडियन्स त्याची दुखापत लपवत असल्याची शंका निर्माण होताना दिसत आहे. सुरूवातीला त्याला दोन सामने बाकावर बसवले अन् कालच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये असूनही त्याच्याकडून गोलंदाजी करून घेतली नाही आणि फलंदाजीत तो अपयशी ठरला. त्यामुळे वर्ल्ड कप संघ निवडीवरून क्रिकेट चाहते सवाल करतच होते आणि त्यात आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी भर पडली. ( Delhi Capitals (DC) co-owner Parth Jindal raised questions over Team India’s squad for the upcoming ICC T20 World Cup)
BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले
जिंदाल यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केला. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यूएई व ओमान येथे वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं या महिन्याच्या सुरुवातीला १५ सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर केला. या संघात सलामीवीर शिखर धवन याला स्थान मिळाले नाही. आयपीएल २०२१त आतापर्यंत सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. तसेच फिरकीपटू युझवेंद्र चहल याचेही नाव संघातून गायब आहे. दुसरीकडे २०१७नंतर आर अश्विनची ट्वेंटी-२० संघात निवड केली गेली. त्याच्यासह वरूण चक्रवर्थी व राहुल चहर हे दोन फिरकीपटू संघात आहेत.
टीम इंडिया आधी बाकी सारं नंतर; विराट कोहलीला 'उद्धट' म्हणत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
पार्थ जिंदाल यांनी ट्विट केलं की, ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघात काही खेळाडूंना का घेतलं, याचा विचार निवड समिती आता करत असेल. या संघात आमचा बेस्ट बॅट्समन नाही- कुणी सांगू शकेल का कोण?'' जिंदाल यांनी हे ट्विट दिल्ली कॅपिटल्स व बीसीसीआयला टॅग केलं.