Join us  

दिल्लीने टॉस जिंकला, लग्नासाठी गेलेल्या खेळाडूची झाली एन्ट्री; RCB ने श्रीलंकेच्या खेळाडूला दिली संधी

RCB vs DC Live Match : आयपीएलच्या १६व्या हंगामातील विसावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू येथे खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 3:14 PM

Open in App

RCB vs DC Live Match Updates । बंगळुरू : आयपीएलच्या १६व्या हंगामातील विसावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs DC) यांच्यात खेळवला जात आहे. चिन्नस्वामी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यासाठी दिल्ली कॅपटिल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर दिल्लीचा संघ आज विजयाचे खाते उघडणार का हे पाहण्याजोगे असेल. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि फाफ डू प्लेसिस प्रथमच आमनेसामने आहेत.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मिचेल मार्शचे पुनरागमन झाले आहे, तर रॉवमेन पॉवेलला वगळण्यात आले आहे. आरसीबीच्या संघात वानिदू हसरंगाला आजच्या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. कौटुंबिक कारणास्तव मायदेशात परतलेल्या मार्शचे दिल्लीच्या संघात पुनरागमन झाल्याने संघाच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मिचेल मार्श लग्नामुळे ऑस्ट्रेलियाला गेला होता पण तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध झाला आहे. तर आरसीबीच्या संघात डेव्हिड विलीच्या जागी वानिदू हसरंगाला संधी मिळाली आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आताच्या घडीला २ गुणांसह क्रमवारीत सातव्या क्रमांकावर स्थित आहे. आरसीबीने ३ सामन्यात १ विजय मिळवला तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपल्या सलामीच्या सामन्या मुंबई इंडियन्सविरूद्ध विजय मिळवल्यानंतर आरसीबीच्या पराभवाची मालिका सुरू झाल्याचे चित्र आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला अद्याप या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सडेव्हिड वॉर्नरविराट कोहली
Open in App