Prithvi Shaw । नवी दिल्ली :आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (DC vs RCB) दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. खरं तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वातील दिल्लीचा या स्पर्धेत सलग पाचवा पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. पृथ्वीच्या खराब फॉर्मवर भारतीय दिग्गजाने एक मोठे विधान केले आहे. मोहम्मद कैफच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी शॉला वाटते की, तो 10 चेंडूत 40 धावा करेल आणि म्हणूनच त्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात देखील पृथ्वी शॉ स्वस्तात माघारी परतला. त्याला एकही धाव काढता आली नाही. त्याला संघात इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात घेण्यात आले होते पण पृथ्वीला खातेही उघडता आले नाही. खराब फॉर्ममध्ये असलेला पृथ्वी बंगळुरूविरूद्ध धावबाद झाला.
कैफचा मोलाचा सल्ला
भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने पृथ्वी शॉच्या सततच्या फ्लॉप शोवर त्याला एक सल्ला दिला आहे. स्पोर्ट्सकीडाशी बोलताना कैफने म्हटले, "पृथ्वी शॉ सरावात चमकदार फलंदाजी करत आहे पण त्याला सामन्यात काय चालले आहे हे कळत नाही. सामन्यात खेळताना मानसिकता खूप वेगळी असते. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की नेटचे दडपण आणि सामन्याचे दडपण यात फरत आहे. पृथ्वी शॉने याचा नक्कीच विचार करायला हवा. तो 10 चेंडूत 40 धावा करेल असे त्याला वाटत आहे पण तसे होणार नाही. पॉवरप्लेमध्ये तुम्हाला प्रत्येक संघाविरूद्ध सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करावा लागेल. पृथ्वी शॉने आपला दृष्टिकोन बदलायला हवा. जर मी तिथे असतो तर मी त्याला सांगितले असते की जा आणि गडबड करू नको, 15 षटकांपर्यंत सावध खेळ. त्याने काही चेंडूत धावा केल्या नाहीत तरी फरक पडत नाही."
दिल्लीचा सलग पाचवा पराभव
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दिल्लीचा पाचवा सामना आरसीबीसोबत झाला. खरं तर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीने २३ धावांनी विजय मिळवून दिल्लीला आणखी एक धक्का दिला. आता दिल्लीचा पुढीला सामना २० एप्रिल रोजी कोलकात नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Delhi Capitals player Prithvi Shaw is in poor form in IPL 2023 and former India player Mohammad Kaif has given him a piece of advice
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.