Join us  

कोरोना बसला दिल्ली कॅपिटल्सच्या मानगुटीवर, टीम सिफर्ट आला पॉझिटिव्ह

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श कोरोनाबाधित झाल्याने सोमवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 9:37 AM

Open in App

मुंबई : पंजाब किंग्जविरुद्ध सामना सुरू व्हायच्या साडेतीन तास आधी बुधवारी दिल्ली कॅपिटल्सचा टिर्मी सिफर्ट हा कोरोनाबाधित आढळला.  बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचणीत सिफर्ट पॉझिटिव्ह आढळला. यामुळे दिल्ली संघातील कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली. 

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श कोरोनाबाधित झाल्याने सोमवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीच्या एका खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘बुधवारी सकाळी आमची कोरोना चाचणी झाली होती. त्यानंतर दुसरी चाचणीही होणार होती. सध्या आम्ही सर्व सदस्य वेगवेगळे राहत आहोत.’ 

पुण्यातील आणखी एक सामना मुंबईतल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ३४वा सामना २२ एप्रिल रोजी पुणे येथे होणार होता. मात्र कोरोना संक्रमणामुळे हा सामना २२ एप्रिललाच वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. 

या सदस्यांना झाली लागणदिल्ली संघात आतापर्यंत सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सिफर्टसह पॅट्रिक फरहार्ट (फिजिओ), चेतन कुमार (मसाज थेरपिस्ट), मिशेल मार्श (अष्टपैलू), डॉ. अभिजित साळवी आणि आकाश माने (सोशल मीडिया टीम सदस्य) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२२
Open in App