नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि विद्यमान भापजाचा खासदार गौतम गंभीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीरविरोधात जवळपास पन्नासजणांनी आपली तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली आहे. गंभीरवर फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दिल्ली पोलिसांमध्ये दाखल करण्यात आला आहे.
तक्ररादारांचे म्हणजे असे आहे की, त्यांनी 2011 साली गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथे फ्लॅट बूक केले होते. रुद्र बिल्डवेल रियल्टी प्रायवेट लिमिटेड आणि एचआर इंफ्रासिटी प्रायवेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचा हा प्रोजेक्ट होता. या दोन्ही कंपन्यांनी लोकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावला आहे. या योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर हा गंभीर आहे. त्यामुळे गंभीरविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीरबरोबर या दोन्ही कंपन्यांच्या मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपपत्रामध्ये म्हटले आहे की, " या घर संकुलांच्या योजना मंजूर करण्याचा अवधी 6 जून 2013 असा होता. पण त्यानंतरही 2014 सालापर्यंत विकासकांनी व्यवहार सुरुच ठेवला."पोलिसांनी म्हटले आहे की, " या योजनेतील प्रस्तावित जमिनीबाबत वाद-विवाद आहे आणि ही गोष्ट गुंतवणूकदारांना सांगण्यात आली नव्हती. या आरेपपत्रामध्ये गौतम गंभीरसह कंपनीचे मालक मुरेश खुराना, गौतम मेहरा आणि बबीता खुराना यांचीही नावे आहेत."