दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर झाला असून, खूप चांगली निवड झाली आहे. दर वेळी परदेशी दौºयासाठी १६ सदस्यांच्या संघाची निवड होते, पण या वेळी १७ सदस्यांचा संघ निवडण्यात आला. म्हणजे १ अतिरिक्त खेळाडू ठेवण्यात आला आहे आणि यावरून आफ्रिका दौरा भारतासाठी किती महत्त्वाचा आहे हे कळते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, जसप्रीत बुमराहची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघात या दौºयासाठी ६ वेगवान गोलंदाज झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघ तोडीस तोड खेळ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच आफ्रिकेच्या वेगवान माºयाला भारतीय संघ वेगवान माºयानेच उत्तर देणार आहे. त्यामुळेच भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेची मोठी उत्सुकता वाढली असून, ही मालिका कधी सुरू होणार, याकडेच सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्याबाबत म्हणायचे झाल्यास, माझ्या मते निकाल लागण्याची शक्यता वाढली आहे. श्रीलंकेने चांगली फलंदाजी केली आहे, खास करून अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार दिनेश चंदिमल यांनी. चंदिमल पुढाकार घेत नसल्याची टीका त्याच्यावर होत होती, पण दोघांनीही चांगले शतक झळकावले. तरी पाचव्या दिवशी फलंदाजी करणे लंकेसाठी सोपे नसेल. मात्र, या सामन्यातील सर्वात मोठा वाद झाला तो प्रदूषणाचा. श्रीलंकेचे खेळाडू सामन्याच्या दुसºयाच दिवशी मास्क घालून मैदानात उतरले होते. यावर बीसीसीआयने भूमिका घेतली होती की, जर आमचे खेळाडू खेळू शकतात, तर श्रीलंकेचे खेळाडू का नाही खेळू शकत? माझ्या मते हे मत चुकीचे आहे. प्रत्येक खेळाडू आपल्यानुसार आरोग्याची काळजी घेईल. त्यामुळेच ही सर्व घटना दिल्लीच्या राज्य सरकार आणि केंद्रीय सरकारला एक इशारा आहे की, प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी लवकरच काही उपाययोजना करावेत. कारण क्रिकेटच्या माध्यमातून आज ही समस्या जगासमोर आली आहे, नाहीतर प्रत्येक दिल्लीकर हे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, हे जाणून आहे. त्यामुळे मला वाटते की, या समस्येकडे केवळ क्रिकेटच्या दृष्टीकोनातून न बघता, यावर उपाय काढणे खूप महत्त्वाचे आहे.
Web Title: Delhi pollution serious
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.