Join us  

६ चेंडूत ६ षटकार! भारतीय खेळाडूचा धुमाकूळ; ट्वेंटी-२० त धावा ३०० पार, आयुष बदोनीचेही शतक

सध्या दिल्ली प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 4:15 PM

Open in App

Delhi Premier League T20 : सध्या दिल्ली प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. रिषभ पंतसारखे नामांकित खेळाडू या स्पर्धेचा भाग आहेत. आज शनिवारी या स्पर्धेत एक अद्भुत खेळी पाहायला मिळाली. दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये दक्षिण दिल्लीचा सुपरस्टार फलंदाज प्रियांश आर्याने ६ चेंडूत ६ षटकार मारण्याची किमया साधली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी त्याने हा कारनामा केला. दक्षिण दिल्लीचा फलंदाज प्रियांश आर्याने उत्तर दिल्लीच्या मनन भारद्वाजविरुद्ध एका षटकात सहा षटकार ठोकले.

याशिवाय आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा भाग असलेला आणि दक्षिण दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने १९ षटकारांच्या मदतीने अवघ्या ५५ चेंडूत १६५ धावांची खेळी केली. दक्षिण दिल्लीच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद ३०८ धावा केल्या. आयुष बदोनी (१६५) आणि प्रियांश आर्या (१२०) यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर दक्षिण दिल्लीने धावांचा डोंगर उभारला. उत्तर दिल्लीच्या संघाकडून सिद्धार्थ सोलंकीने सर्वाधिक ३ बळी घेतले मात्र त्यानेही ५२ धावा दिल्या.

दरम्यान, सामन्याच्या १२व्या षटकात प्रियांश आर्याने मनन भारद्वाजविरुद्ध आक्रमक पवित्रा दाखवला. प्रियांशने षटकातील पहिला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. मग पुढचे पाचही चेंडू याचपद्धतीने खेळाडूंना प्रेक्षक बनवत राहिले. एकाच षटकात सहा षटकार ठोकून आर्याने दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये इतिहास रचला. तसेच एका षटकात सहा षटकार मारणारा रवी शास्त्री आणि युवराज सिंग यांच्यानंतर आर्या तिसरा भारतीय ठरला.

टॅग्स :दिल्लीटी-20 क्रिकेट