Join us  

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारानंतर वीरेंद्र सेहवाग झाला भावूक, म्हणाला दिल्लीकरांनो...

सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 24 जणांचा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 9:05 PM

Open in App

सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 24 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सेहवागने दिल्लीकरांना एक विनंतीही केली आहे.

दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले.

दिल्लीतील हिंसाचारानंतर सेहवाग म्हणाला की, " जे काही दिल्लीमध्ये होत आहे ते दुर्देवी आहे. माझी सर्व दिल्लीकरांना विनंती आहे की, त्यांनी शांत रहावे आणि आपल्या परिसरात शांतता कधी नांदेल, याचा विचार करावा. मला आशा आहे की, सर्व दिल्लीकर यापुढे शांततेच्या मार्गाने आपले काम करतील." 

सेहवागबरोबर भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग म्हणाला की, " दिल्लीमध्ये जे काही होत आहे ते हृदयद्रावक आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, त्यांनी शांतता राखावी. प्रशासन योग्य तो निर्णय यावर घेईल. सरतेशेवटी आपण सारे माणसं आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये प्रेमभाव आणि आदर असणे महत्वाचे आहे." 

 

टॅग्स :विरेंद्र सेहवागदिल्लीदिल्लीपोलिसनागरिकत्व सुधारणा विधेयक