नवी दिल्ली : आम्रपाली समुहासोबत असलेले व्यावसायिक संबंध महेंद्रसिंग धोनीला महागात पडण्याची लक्षणं आहेत. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कॅट) आणि आम्रपालीमधील फ्लॅट खरीददारांची संस्था नेफोवा यांनी केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडे धोनीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम्रपाली समूहासाठी जाहीरात केल्यामुळे धोनीवर कारवाईची मागणी होत आहे.
आम्रपाली समूहावर कठोर करवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेत जर बिल्डर दोषी असेल तर धोनीही तितकाच जबाबदार असेल, असा दावा कॅटनं केला. धोनीनं जाहिरात केल्यामुळे सामान्य लोकांनी जमापूंजी या समूहात फ्लॅट घेण्यासाठी गुंतवली.
धोनीवरील 'त्या' वक्तव्यावरून योगराज सिंग यांचा घुमजाव
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी सातत्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना धोनी जाणीवपूर्वक हरला, अशी टीका योगराज यांनी केली होती. त्यावरून बरीच खळबळ माजली, परंतु आता योगराज यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली आहे. त्यांनी धोनी दिग्गज खेळाडू असल्याचे मत व्यक्त केले आहे.
योगराज यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,''न्यूझीलंडने ठेवलेले माफक लक्ष्य धोनी पार करू शकला असता, पण त्याची तशी इच्छाच नव्हती. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणी भारतीय कर्णधाराने वर्ल्ड कप उचंवावा, हे त्याला नको होते. रवींद्र जडेजा खोऱ्यानं धावा करत होता, त्यावेळी भारत हे लक्ष्य पार करेल असे स्पष्ट चित्र होते. पण, धोनीनं त्यावेळी उपयुक्त खेळी केली नाही.''
पण, योगराज आता म्हणाले की,''मी असे कधीच म्हणालेलो नव्हतो. त्या पराभवासाठी मी धोनीला जबाबदार धरले नाही. ते माझे वक्तव्य नव्हते. चुकीच्या माणसाला चुकाची प्रश्न विचारला गेला होता. त्याने देशासाठी बरेच योगदान दिले आहे. तो एक दिग्गज खेळाडू आहे. मीही धोनीचा फॅन आहे.''
Web Title: Demand for action against mahendra singh dhoni in aamrapali group case
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.