नवी दिल्ली :
आयपीएलच्या २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी प्रसारण हक्कांची बीसीसीआयकडून विक्री करण्यात आली. त्यासाठी झालेल्या लिलावातून बीसीसीआयला तब्बल ४८,३९०.५३ कोटींची घसघशीत कमाई झाली आहे. यामुळे एका सामन्याचा मूल्याचा विचार केला तर आयपीएल ही जगातली दुसरी सर्वात श्रीमंत लीग ठरली. या लिलावासाठी बीसीसीआयने विशेष चार पॅकेजेस गुंतवणूकदारांसमोर ठेवले होते.
याअंतर्गत स्टारने भारतीय उपखंडात टीव्ही प्रसारणाचे हक्कांसाठी असलेले पॅकेज ए हे २३,५७५ कोटींना खरेदी केले. तर रिलायन्सच्या व्हायकॉम १८ या कंपनीने डिजिटल हक्कांसाठी असलेले पॅकेज बी आणि सी अनुक्रमे २०,५०० आणि ३२५८ कोटी रुपयांना खरेदी केले. बीसीसीआयचे चौथे पॅकेज हे भारतीय उपखंडाबाहेरील टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्कांसाठी होते. ते व्हायकॉम १८ आणि टाइम्स इंटरनेटने २,९९१ कोटींना खरेदी केले.
याचाच अर्थ असा की स्टारला एका आयपीएल सामन्यासाठी ५७.५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. भारतात डिजिटल क्रांती घडवणारी रिलायन्स एका आयपीएल सामन्यासाठी ५० कोटी रुपये बीसीसीआयला देईल. याव्यतिरिक्त ठराविक १८ सामन्यांचे डिजिटल हक्कसुद्धा रिलायन्सच्या व्हायकॉम १८ ने जिंकले आहेत. यानुसार प्रत्येक सामन्यासाठी त्यांना ३३.२४ कोटी रुपये भरावे लागतील.
विशेष म्हणजे २०१८ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालवधीसाठी आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल हक्कांपोटी स्टारने १६,३४८ कोटी रुपये मोजले होते. यावेळी जवळपास तिपटीने या किमतीत वाढ झाली आहे.
बीसीसीआयने निर्धारित केलेले पॅकेजेस आणि त्याचे मूल्य
पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी
पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी
पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात १८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी
पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी
आयपीएल जगातील दुसरी सर्वात श्रीमंत लीग
टीप : नॅशनल फुटबॉल लीगची सुरुवात १९२० साली आणि आयपीएलची २००८ ला. म्हणजेच केवळ १५ वर्षांच्या कारकिर्दीत आयपीएल ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत लीग ठरली.
नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) = १३३ कोटी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)= ११८ कोटी
इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) = ८६ कोटी
मेेजर लीग बास्केटबॉल (एमबीएल)= ८६ कोटी
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) = १५.६ कोटी
Web Title: Demand for digital in IPL base price for each match 33 crores got 50 crores
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.