नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघासाठी पगारवाढीची केलेली मागणी गुरुवारी प्रशासकांच्या समितीने (सीओए) मान्य केली आहे. समितीने व्यस्त कार्यक्रमाच्या मुद्यावर त्यांच्याकडून माहितीही घेतली.
कोहली व धोनी यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह
आज (गुरुवारी) सीओए प्रमुख विनोद राय, डायना एडलजी आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची भेट घेतली.
राय यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की,‘आम्ही या मुद्यावर खेळाडूंसोबत सखोल चर्चा केली. त्यात त्यांना किती सामने खेळायचे आहेत, भविष्यातील दौरा कार्यक्रम (एफटीपी) आणि मानधनाचे पॅकेज आदी मुद्यांचा समावेश आहे.’
राय पुढे म्हणाले,‘त्यांना आम्हाला जेवढी माहिती द्यायची होती ती आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्यानुसार काम करणार आहोत. एफटीपीबाबत ते सहमत आहेत. त्यांना विश्रांतीची संधी मिळायला हवी. दिवसांच्या संख्येबाबत मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.’
खेळाडूंना सध्या लागू असलेल्या वेतनश्रेणीमध्ये ‘अ’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना वार्षिक दोन करोड रुपये मिळतात. ‘ब’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना एक कोटी, तर ‘क’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना दर वर्षी ५० लाख रुपये देण्यात येतात.
अंतिम अकरामध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाटी सामना शुल्क १५
लाख रुपये तर वन-डे व टी-२०
साठी अनुक्रमे ६ लाख व ३ लाख रुपये देण्यात येतात. ज्या खेळाडूंचा अंतिम ११ मध्ये समावेश नसतो पण ते संघाचे सदस्य असतात त्यांना या रकमेची अर्धी रक्कम दिल्या
जाते. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सीओएला दिलेल्या अहवालामध्ये ‘अ’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. नवी वेतनश्रेणी व सामना शुल्काची राशी याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (वृत्तसंस्था)
Web Title: The demand for the salary increase of the cricketers is valid - the COA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.