IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार

IND vs AUS FINAL : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 01:10 PM2023-11-18T13:10:35+5:302023-11-18T13:10:59+5:30

whatsapp join usJoin us
Deputy Prime Minister and Defence Minister of Australia Richard Marles to attend the Cricket World Cup Final between India and Australia in Ahmedabad  narendra modi stadium, read here details  | IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार

IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

icc odi world cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा बहुचर्चित सामना होत आहे. यासाठी खास क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली असून चाहत्यांना मनोरंजन करण्यासाठी बीसीसीआयने काही कार्यक्रमांचे आयोजन केले. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स हे देखील उद्याचा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून १८ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, उपांत्य फेरीत बलाढ्य न्यूझीलंडला ७० धावांनी पराभवाची धूळ चारून यजमान संघाने फायनलचे तिकिट मिळवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता दाखवून ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद येथे फायनल खेळण्याचा मार्ग मोकळा केला. तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होत असून २० वर्षांचा बदला घेण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. 
 
साखळी फेरीत ऑस्ट्रेलियालाच नमवून भारताने विजयी सलामी दिली होती. भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले. 

Web Title: Deputy Prime Minister and Defence Minister of Australia Richard Marles to attend the Cricket World Cup Final between India and Australia in Ahmedabad  narendra modi stadium, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.